बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या युवा फोटोग्राफर यांच्या माध्यमातून मेळावा संपन्न
बारामती मध्ये फोटोग्राफर यांना विविध व्यवसायिक मान्यवरांचे मार्गदर्शन
बारामती:- फोटोग्राफी व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर होत असताना फोटोग्राफर व्यवसायाचा चा विकास व हित जोपासले जावे या उद्देशाने बारामती तालुक्यातील सर्व फोटोग्राफर यांना एकाच छताखाली आणून त्यांच्या समस्या ,व्यवसायातील अडचणी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी बारामती तालुका फोटो ग्राफर असोसिएशन च्या वतीने शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी ऍड भार्गव पाटसकर, टॅक्स कन्सल्टंट नितीन डोईफोडे,स्टार हेल्थ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी योगेश पुरोहित,दौड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड व बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व आजी, माजी पदाधिकारी,ज्येष्ठ फोटोग्रापर व युवा फोटोग्राफर उपस्तीत होते.
व्यवसाय करताना कायदेशीर बाबीचा चा आधार घेतल्यास अडचणी चा सामना करणे सोपे होत असल्याचे मत ऍड भार्गव पासटकर यांनी सांगितले.
व्यवसाय छोटा अथवा मोठा असो प्रत्येक फोटोग्राफर आय टी रिटन भरल्यास व्यवसाय वाढविण्यासाठी बँक मधून कर्ज मिळणे सोपे होईल व व्यवसाय गतिमान होण्यासाठी मदत होणार असल्याचे टॅक्स कन्सल्टंट नितीन डोईफोडे यांनी सांगितले
व्यवसाय करताना वेळी, अवेळी जेवण, प्रवास आदी बाबी होतात त्यामुळे शारीरिक तक्रारी होतात म्हणून स्वतःचा व कुटीबीयांचा आरोग्य विमा असल्यास आर्थिक ताण येणार नाही म्हणून म्हणून आरोग्य विमा गरजेचा असल्याचे आरोग्य विमा अधिकारी योगेश पुरोहित यांनी सांगितले.
व्यवसायिक स्पर्धा टाळून फोटोग्राफर चे उत्पन्न वाढले पाहिजे या साठी प्रयत्न झाले पाहिजे ,एका बॅनर खाली सर्वांनी आले पाहिजे, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले ही काळाची गरज असल्याचे दौंड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी सांगितले
या प्रसंगी फोटोग्राफी क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ फोटो ग्राफर यांचा सन्मान करण्यात आला
या प्रसंगी युवा फोटोग्राफर यांनी पुढाकार घेऊन विविध मान्यवरांचे मार्गदर्शन ,सभासद नोंदणी, शासनाच्या विविध कर्ज योजना आदी बाबत उपस्तीत याना माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्तीत फोटोग्राफर यांनी समाधान व्यक्त केले .
स्वर्गीय अजित दादा यांना श्रद्धांजली व मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
No comments:
Post a Comment