राजीव (साई) किरण इंगळे यांचे आकस्मिक निधन; बारामतीत शोककळा...
अमरधाम, चांदशावली दर्गा येथे अंत्यविधी; ‘जय अजितदादा पवार’ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
बारामती : बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. श्री. किरण भाऊ इंगळे यांचे चिरंजीव राजीव (साई) किरण इंगळे यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यानंतर इंगळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
राजीव (साई) इंगळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी इंगळे कुटुंबीयांशी संपर्क साधून शोक व्यक्त केला. अल्पावधीतच या दुःखद घटनेने परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले.
राजीव (साई) इंगळे यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता अमरधाम, चांदशावली दर्गा येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीसाठी नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी ‘जय अजितदादा पवार’ यांच्या वतीने अमरधाम, चांदशावली दर्गा येथे जाऊन राजीव (साई) इंगळे यांना अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच उपस्थितांनी इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
राजीव (साई) इंगळे यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या जाण्याने नातेवाईक आणि मित्रपरिवारावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या दुःखद प्रसंगी ॲड. किरण भाऊ इंगळे व इंगळे परिवाराच्या दुःखात बारामतीतील नागरिक, मित्रपरिवार आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
राजीव (साई) किरण इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि इंगळे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
No comments:
Post a Comment