बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई;बेकायदेशीर गावठी कटटा बाळगणाऱ्या परराज्यातील आरोपीस केले जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2026

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई;बेकायदेशीर गावठी कटटा बाळगणाऱ्या परराज्यातील आरोपीस केले जेरबंद..

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई;बेकायदेशीर गावठी कटटा बाळगणाऱ्या परराज्यातील आरोपीस केले जेरबंद..
बारामती :- बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक ७/९/२०२६ रोजी सायंकाळी १७:३० वा. चे सुमारास पोलिस निरीक्षक श्री. नारायण पवार साहेब, ग्रेड पोसई शिंगाडे, तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सहा पोलीस फौजदार सुरेंद्र वाघ, पो. हवा. एकशिंगे बं.नं १८५२,पो. हवा. उगले बं.नं २६३७, जितेंन्द्र शिंदे.बं. नं २९१८, पो. कॉ. वाकळे बं.नं २९१२, चालक पो. कॉ. तरंगे
असे हजर असताना पो. हवा. उगले यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, इसम नामे सत्यदेव भिमसेन वर्मा सध्या रा. ऐश्वर्या बेकरीजवळ सुर्यनगरी बारामती जि. पुणे हा त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन मौजे वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे गावचे हददीत हॉटेल जंगदंबा नजीक बारामती भिगवण रोडलगत उभा राहिला आहे. अशी माहिती मिळताच त्यांनी सदर बातमी प्रभारी अधिकारी. नारायण पवार यांना कळविलेनंतर त्यांनी लागलीच दोन पंचांना बोलावुन सदर ठिकाणी पंच व पोलीस स्टाफसह जावुन सत्यदेव भिमसेन वर्मा सध्या रा. एैश्वर्या बेकरीजवळ सुर्यनगरी बारामती जि.पुणे मुळ रा. रा. हत्याबाद ता. आग्रा. जि. आग्रा राज्य उत्तरप्रदेश याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असे मिळुन आलेने ते दोन पंचासमक्ष जप्त करुन सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन
महेश अंकुश उगले पो. हवा.बं. नं २६३७ यांनी दिले फिर्यादीवरुन सदर आरोपी विरुद्ध भारतीय
हत्यार कायदा कलम ३,२५ व महा. पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही मा. संदिपसिंह गिल. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. चैतन्य कदम. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री. नारायण पवार, ग्रेड पोसई कल्याण शिंगाडे, सहा फौजदार सुरेंद्र वाघ, पो.हवा. एकशिंगे ब.नं १८५२,पो.हवा.उगले बं. नं २६३७, जितेंन्द्र शिंदे. बं. नं २९१८, पो. कॉ. वाकळे बं.नं २९१२,चालक पो.कॉ. तरंगे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे हे करीत आहेत

No comments:

Post a Comment