धक्कादायक...दारूसाठी पैसे न दिल्याने केला पत्नीचाच खून;आजही चालू आहे खुलेआम अवैध दारू विक्री,कारवाई होत नाही? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 10, 2023

धक्कादायक...दारूसाठी पैसे न दिल्याने केला पत्नीचाच खून;आजही चालू आहे खुलेआम अवैध दारू विक्री,कारवाई होत नाही?

धक्कादायक...दारूसाठी पैसे न दिल्याने केला पत्नीचाच खून;आजही चालू आहे खुलेआम अवैध दारू विक्री,कारवाई होत नाही?
बारामती(संतोष जाधव):-दारू संसार उदवस्थ करते यापायी अनेकांचे बळी गेले, कित्येकजण अंथरूण पकडून आहे, तर कुणी गुन्हेगार झाले आहे, दारू साठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी या दारुड्याची असते, दारू माणसाला बरबाद करते असं म्हणतात.अवैध दारू विक्री कधी बंद होणार ही विषारी दारू पिऊन अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष, मुलगा याला बळी पडला आहे, या दारू विकणाऱ्यां वर कारवाई होत नाही, आर्थिक माया मिळविण्याचा फक्त धंदा झाला असून कित्येक हॉटेल, ढाबा, घरगुती,टपरीतून अवैध दारू व हातभट्टी विकली जाते याकडे आर्थिक माया घेत असल्याने लक्ष दिले जात नसल्याचे अनेक महिलांनी बोलून दाखविले. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खाते याकडे जाणून बुजून लक्ष देत नसल्याचे कळतंय जर झालीच तर ती तुटपुंजी कारवाई होती. नीरा,बारामती,जेजुरी,सासवड,हडपसर याभागातून येत असलेली दारू तालुक्यातील व शहरातील अनेक भागात गावात अवैध रित्या विकली जाते तर भल्या पहाटे कारमधून व दुधाच्या कैन्ड मधून हातभट्टी सप्लाय होतेय असे कळतंय याला कुणाचा आशीर्वाद आहे हे येणाऱ्या काळात उघड होईलच व किती यामागे हप्ते गोळा केले जातात अशीही चर्चा रंगत आहे. नुकताच माळेगाव येथील घटनेने खळबळजनक प्रकार घडलेला बाहेर आला.ज्याठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विकली जाते तिथे कारवाई सोडून माळेगावात रात्रीच्या वेळेस महिलांना मारहाण करीत कारवाई करण्यासाठी गेलेले अधिकारी व महिलांच्यात चांगलाच वाद पेटला होता यामुळे बारामती सारख्या गावात असं घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्रात समजले. अजून वेळ गेलेली नसून आत्ता तरी कडक कारवाई मूळ दारू सप्लाय करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने करावी जेणे करून अनेकांचे कुटुंब उदवस्थ होऊ नये, कारण नुकताच मुंबई येथील एका घटनेत 
मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथे पत्नी दारूला पैसे देत
नाही या कारणावरून एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला कायमचे संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे तात्काळ अश्या घटना घडू नये यासाठी कारवाई होणं गरजेचं आहे.तसेच बारामती व तालुक्यातील आपल्या आसपासच्या परिसरात व हॉटेल, ढाबा, घरगुती, टपरी येथे अवैध दारू, हातभट्टी विकताना दिसल्यास जवळील पोलीस स्टेशनमध्ये खबर द्यावी किंवा पोलीस अधीक्षक यांना मेसेज करावा.आपल्या भागातील असे अवैध धंदेचे फोटो, व्हिडिओ काढून या आम्हाला(mo-9595628383) पाठवा आम्ही बातमी द्वारे प्रकाशित करू राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पाषाण पुणे यांना कळवू.यावेळी महिला मंडळाच्या वतीने अवैध दारू बंदीसाठी आंदोलन करणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment