निरा गावची दारू मोरगाव तीर्थक्षेत्रात कुणाच्या आशीर्वादाने? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 9, 2024

निरा गावची दारू मोरगाव तीर्थक्षेत्रात कुणाच्या आशीर्वादाने?

निरा गावची दारू मोरगाव तीर्थक्षेत्रात कुणाच्या  आशीर्वादाने?
मोरगाव:-बारामती तालुक्यातील अनेक गावात अवैध दारू खुलेआम विकली जात असली तरी याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही हे त्या गावात अवैध धंदे चालू असल्यास दिसून येईल,नुकताच बारामती तालुक्यातील सुपा गावात भले मोठे प्रशस्त असे पोलीस स्टेशन बांधले त्याचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले देखील त्यावेळी अजितदादा यांनी अवैध धंदे चालू असल्याचे खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबी भाषण करताना केली होती, मात्र ते हवेतच विरून गेले की काय अशी अवस्था झाल्याची स्थानिक रहिवाशांनी बोलताना व्यक्त करताना दिसतात,सुपा पोलिसांनी कारवाई केली पण ती मोठ्या धंद्यावर व्हायला पाहिजे होती ती होत नसल्याचे स्थानिक रहिवासी बोलतात.निरा गावातून येणारी  देशी दारू मोरगावात सुपा पोलिसांच्या आशीर्वादाने तर येत नाही नाही ना?अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे, कारण मोरगाव हे मोरयाचे तीर्थक्षेत्र आहे अश्या गावात देशी दारू व हातभट्टी खुलेआम विकली जात असेल तर काय म्हणावे पोलीस कारवाई करताना दुजाभाव करीत तर नाही ना? यासाठी लवकरच समाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या महिला भगिनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून आंदोलन करणार असून देशी दारू पुरविणारा मूळ सप्लायर यांच्यावर कडक कारवाई करून खऱ्या अर्थाने मोरगाव गावात दारू बंदी होईल.कारवाई होताना दुजाभाव होत असल्याने याबाबत देखील संबंधितावर कारवाई ची मागणी होईलच पण आपले पोलीस खाते कर्तव्य दक्ष असून याबाबत नक्कीच चांगला नावलौकिक मिळवाल ही अपेक्षा मोरगाव व सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्याकडून बाळगु या अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment