वसंतनगरला दुजाभावाची वागणूक, कमी दाबाने सोडले जाते पाणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 8, 2024

वसंतनगरला दुजाभावाची वागणूक, कमी दाबाने सोडले जाते पाणी..

वसंतनगरला दुजाभावाची वागणूक, कमी दाबाने सोडले जाते पाणी..
बारामती(संतोष जाधव):-बारामतीचा झपाट्याने विकास होत चाललेला असला तरी बारामती शहरातील वसंतनगर भाग व आसपासचा परिसर मात्र नेहमीच दुर्लक्षित रहात चालला असल्याचे दिसत आहे, याकडे नेत्याचे व प्रशासनाचे लक्ष जावे म्हणून वारंवार प्रयत्न करावा लागत असल्याचे दुर्दैव आम्हा स्थानिक रहिवाशांच्या पदरी येत आहे, रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागला, पिण्याच्या पाण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागत लागत आहे,जवळच कॅनॉल आहे मात्र कॅनॉलला सिमेंट कॉक्रीटीकरण केल्याने वसंतनगर व आसपासच्या भागातील बोअर बंद पडलेल्या आहेत, तर कुठे कमी पाणी येते अश्या अवस्थेत पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था वारंवार होत आहे, कमी दाबाने पाणी सोडन ही नित्याचीच बाब होऊन बसली असल्याचे स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करताना प्रतिक्रिया दिल्या, या भागात कामगार वर्ग ज्यादा प्रमाणात असल्याने तत्यांची होत असलेली ससेहोलपट मात्र प्रत्यक्षात त्यांच्या प्रतिक्रिया घेताना लक्षात येईल,वारंवार या भागाला दुजाभावाची वागणूक मिळत तर नाही ना? प्रश्न पडत आहे,घंटा गाडी उशिरा येत असते कामगार वर्ग हा सकाळी लवकर कामावर जात असतो जर कचरा गोळा करणारी गाडी सकाळी लवकर आली तर घरातील कचरा त्यामध्ये टाकता येतो मात्र उशिरा येत असल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांना कचरा तसाच ठेवावा लागत असल्याने सकाळी लवकर घंटा गाडी यावी अशी मागणी देखील स्थानिक रहिवासी व कामगार वर्गातील नागरिक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment