बारामती जिल्हा न्यायालयाकडुन
खुन प्रकरणात 3 आरोपींची निर्दोष मुक्तता.
बारामती:- सन 2014 साली मृत अनिल बाकु धोत्रे याच्या खुनप्रकरणात बारामती शहर पोलीसांनी 3 आरोपींना अटक केली होती. सदर
प्रकरण बारामती जिल्हा न्यायालयात प्रलंबित
होते. नटी या प्रकरणात सरकारच्या वतीने
6 साक्षीदार तपासले सदर प्रकरणात सरकारी पक्षाने हा खुन सिद्ध केला असला तरी परिस्थीतीजन्य पुराव्यावरती आरोपीनीच खुन
केला आहे हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही, असा अँड सारथी पानसरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे.कोर्टाने रवि सूर्यकांत जाधव, सचिन बबन कांबळे, सचिन बाबु रणदिवे यांची खुनाच्या गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली,याकामी अॅड गणेश लोंढे,अॅड प्रशांत खटाव व अॅड आशिष केकाण यांनी बचाव पक्षाला मदत केली.
No comments:
Post a Comment