खळबळजनक..बारामती तालुक्यात कोयत्याने हल्ला करून कॉलेजच्या मुलाचा केला खून..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 18, 2024

खळबळजनक..बारामती तालुक्यात कोयत्याने हल्ला करून कॉलेजच्या मुलाचा केला खून..!

खळबळजनक..बारामती तालुक्यात कोयत्याने हल्ला करून कॉलेजच्या मुलाचा  केला खून..!
बारामती:-बारामतीत नक्की चाललंय काय?दोन चार दिवस होत नाहीं की पुन्हा एकावर कोयत्याने हल्ला करीत खून केला असल्याने खळबळ उडाली आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुका आज पुन्हा कोयता गँगच्या हल्ल्याने दहशतीच्या छायेत आला, चक्क अल्पवयीन मुलांनी कोयता, सत्तूराचे वार करीत
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाचा निर्घृण
खून केला. काही दिवसांपूर्वीच बारामतीत लॉजवर महिलेची हत्या, चायनीज खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या  युवकावर काठी, लोखंडी रॉडने सहा जणांनी हल्ला करून त्यास
गंभीर जखमी केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,जामदार रोड नजीक अपार्टमेंट मध्ये नवरा बायकोचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली त्यास काही दिवस उलटत नाहीत, तोच आता उंडवडी सुपे परिसरात ही घटना घडली आहे. आजच्या घटनेत कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या
या युवकाचा चार ते पाच जणांनी केलेल्या
हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या
विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच
जणांनी कोयता व कुऱ्हाडीने अनामुष वार
करून गंभीर जखमी केले. यातच त्याचा
मृत्यू झाला. पोरापोरांच्या वादातून ही
घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून
येत असून यात आणखीही काही कारणे
असावीत असे सांगितले जात आहे.
दरम्यान या परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या सुपे पोलिसांनी या पाचहीअल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments:

Post a Comment