बारामतीत पोलीस अधीक्षकाचं आहे दुर्लक्ष..!कारण दारू, मटका चालकांवर नाही पोलिसाचं लक्ष..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 13, 2024

बारामतीत पोलीस अधीक्षकाचं आहे दुर्लक्ष..!कारण दारू, मटका चालकांवर नाही पोलिसाचं लक्ष..!!

बारामतीत पोलीस अधीक्षकाचं आहे दुर्लक्ष..!
कारण दारू, मटका चालकांवर नाही पोलिसाचं लक्ष..!!
बारामती:-बारामतीत राजकिय वातावरण नुकताच शांत झाले मात्र निवडणूकीचे निकाल 4 जून रोजी येथील तोपर्यंत तरी फक्त कोण किती लीड नी येईल याचीच चर्चा चालू आहे, अश्यातच मात्र अवैध दारू विक्री व मटका तसेच ऑनलाइन मटका जोरात चालू असून यामध्ये कोण किती जास्त प्रमाणात हप्ते देतोय यासाठी स्पर्धा चालू असल्याचे कळतंय. पोलीस अधिकारी यांचे कलेक्शन गोळा करणारे एजंट(कलेक्टर)मात्र मर्जीनुसार नेमले असल्याचे पोलीस दलात नाराज असणारे पोलीस दबक्या आवाजात बोलत आहेत.तर अवैध धंदेवाले मात्र सुसाट असून आमचं काहीच वाकडं होत नाही अश्या अविर्भावात फिरताना दिसत आहे.गेली दोन महिने मात्र अवैध धंदे बंद असल्याचे पोलीस सांगत असले तरी हे चुपके चुपके धंदे चालूच होते हे सर्वांनी पाहिले असेल. याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले असले तरी मात्र अश्या अवैध धंदे चालू असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीतील संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कडक अशी कारवाई केल्याचे दिसून येत नसल्याने संशय व्यक्त होताना दिसत आहे,अश्या अवैध दारू व मटका व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र त्यातल्या त्यात गरीब लोकांवर कारवाई आणि मालक मोठे व्यावसायिक यांच्यावर कारवाई होत नाही यामागचं काय गौडबंगाल आहे हे लवकरच प्रकाशित करणार असून, आपल्या परिसरात चालू असणाऱ्या अवैध धंद्याची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment