बापरे... कर्जाचे पैसे माफ करण्यासाठी
तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; नकार
दिल्याने तरुणीच्या मानेवर चाकुने वार.
बारामती :-महिला अत्याचार वाढतच चाललेला असून अलीकडे सावकारी देखील वाढत असल्याचे दिसत आहे, यातून नको ते प्रकार घडत असून वसुलीसाठी माणूस कुठल्या थराला जातो याची अनेक उदाहरणे आहेत,नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर तरुणाने चाकू हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दि. १६ सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.याबाबत एका १९ वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्तात्रय चंद्रकांत कुंभार (रा. भैय्यावस्ती मळद, ता. बारामती) याच्यावर
पोस्कोसह बाल लैंगिक अत्याचार व विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय कुंभार याने तरुणीच्या आई वडिलांना कर्ज व उचल स्वरुपात काही पैसे दिले होते. दरम्यान, आरोपीने हे पैसे माफ करतो
असं म्हणत फिर्यादी यांच्याकडे शरिरसुखाची मागणी केली.यावेळी फिर्यादी तरुणीने आरोपीला नकार दिला. त्यानंतर तरुणीचे तोंड दाबुन कुंभार याच्याजवळ असलेल्या चाकुने तरुणीच्या मानेवर वार केले.तसेच पोटामध्ये चाकु खुपसण्याचा प्रयत्न करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या जबाबावरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे प्रभारी अधिकारी, बारामतीचे उपविभागीय अधिकारी राठोड करीत आहेत.
No comments:
Post a Comment