बापरे..बैलाच्या 32 लाखाच्या व्यवहार प्रकरणात चक्क गोळीबारात एकाचा मृत्यू.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

बापरे..बैलाच्या 32 लाखाच्या व्यवहार प्रकरणात चक्क गोळीबारात एकाचा मृत्यू..

बापरे..बैलाच्या 32 लाखाच्या व्यवहार प्रकरणात चक्क गोळीबारात एकाचा मृत्यू..
बारामती:-बारामती तालुक्यातील गोळीबार प्रकरण चांगलेच गाजले असताना जखमी
झालेले रणजित निंबाळकर यांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजले, सोमेश्वर
कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या होत्या गोळ्या तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे  यांच्या निवासस्थानी 27 जून रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामध्ये फलटण येथील रणजीत एकनाथ निंबाळकर(रा. तावडी, ता. फलटण,जि. सातारा) हे जखमी झाले होते.
त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात
उपचार सुरु होते. निंबाळकर यांचा उपचारादरम्यान 28 जून रोजी रात्री दोन
वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गौतम शहाजीराव काकडे यांच्यासह तीन
अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित
निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणीचा व्यवहार झाला होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे 27 जून रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या घरी गेले
होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची
होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे
याचा भाऊ गौरव काकडे याने गोळीबार
केला. यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या
डोक्यात गोळी लागली होती. जखमी
झालेल्या निंबाळकर यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंकिता निंबाळकर यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार, एक वर्षापूर्वी सर्जा हा बैल
निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून
61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर
यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून
2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजीराव काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख
रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये
येणे बाकी होती.दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव
तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी
निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी
रणजित निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यावरुन आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले
असून यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment