धक्कादायक..गुटख्याची मागणी केली तो देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलावर सपासप वार करून केला खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 30, 2024

धक्कादायक..गुटख्याची मागणी केली तो देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलावर सपासप वार करून केला खून..

धक्कादायक..गुटख्याची मागणी केली तो देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलावर सपासप वार करून केला खून..
मुंबई :- खळबळ जनक घटनेने शहर हादरला असला तरी अशी गुटखा विक्री राजरोस पणे सगळीकडे चालू असल्याचे दिसत असून त्यावर कारवाई होत नाही नव्हे ती केली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नुकताच धक्कादायक घटना घडली राज्यात गुटखाबंदी कायदा लागू आहे. तरीही मोठ्या प्रमाणात टपऱ्यांवर गुटख्याची विक्री केली जाते. गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून अवघ्या 17
वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. वसंत गार्डन परिसरातील एका धबधब्याजवळ हा खून केला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम येथे
खुनाची ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन ताज हुसैन खान असे मृत तरूणाचे नाव असून तो अवघ्या 17 वर्षांचा होता. पीडित मुलगा त्याच्या 16 वर्षीय मित्रांसह परिसरात गेला तेव्हा तिघांचं टोळकं त्याच्याकडे आलं.पीडित तरूणाकडे त्यांनी गुटख्याची मागणी केली. मात्र
त्याने तो देण्यास नकार दिल्याने त्या मुलाशी तिघे जण वाद घालू लागले. भांडणादरम्यान, संतापाच्या भरात एका तरूणाने सुरा काढला आणि पीडित तरूणावर सपासप वार केले. त्याची छाती, हाता-पायांवर वार करून ते तिघेही
तेथून फरार झाले.या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित मुलाला उपचारांसाठी तातडीने अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती
मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत याप्रकरणी एकूण ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment