शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या मार्फत अवयवदान जनजागृती या विषयावर व्याख्यान संपन्न..
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय येथे अवयवदान जनजागृती या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
अवयवदान जनजागृती व अवयवदान चळवळ गेल्या काही वर्षात गती पकडत असताना कोरोना महामारीच्या काळात हि मोहीम मंदावली होती. या मंदावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी पुन्हा अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून जुलै व ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागा मार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या मार्फत ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या मार्फत पथ नाट्य, रांगोळी स्पर्धा, वकृत्व, चर्चा सत्र व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ डॉ डॅनियल साजी व डॉ रितेश सोनवणे तर समन्वयक डॉ तुषार सावरकर , समाज सेवा अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव हे होते.
या अभियानाचा भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या मार्फत लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय येथे अवयवदान जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ घुगे यांनी केले. भारतातील अवयवदान या विषयावर डॉ रितेश सोनवणे, नोडल अधिकारी व डॉ तुषार सावरकर, समाजसेवा अधिक्षक यांचे व्याख्यान झाले. डॉ रितेश सोनवणे यांनी अवयव दान चळवळ, या बाबतचे गैरसमज, मृत स्तंभ अवयवदान, जीवंतपणी होणारे दान व मृत स्तंभ द्वारे होणारे अवयव दान याबाबात मार्गदर्शन केले.
डॉ तुषार सावरकर यांनी समाजकार्य विद्यार्थी व व्यावसायिकांची भूमिका, अवयव दान व प्रत्यारोपणात स्त्री व पुरुष विषमता, भारतातील अवयवदान चळवळीचा वाढता प्रभाव व विविध राज्यातील अवयवदान व प्रत्यारोपण याबाबात विद्यार्थ्यांना माहिती दिली.
हा कार्यक्रम, डॉ गिरीष ठाकुर, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ डॅनियल साजी नोडल अधिकारी, डॉ रितेश सोनवणे नोडल अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. प्राचार्य राकेश चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment