बारामतीत भाजपच्या वतीने तीन हत्ती चौकातील अपघात टाळण्यासाठी सुधारणा व्हावी साठी निवेदन,तर दि.15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा..
बारामती:-बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदनात
तीन हत्ती चौक उर्फ जिवघेणा चौक झाला असून येथील होणारे वारंवार अपघात होतात तसेच बारामती येथील तीन हत्ती चौक उर्फ जिवघेणा चौक या ठिकाणी मोठया प्रमाणात जागा उपलब्ध असताना अति हुशार कन्सल्टींग एजन्सीने पुलावर गार्डची रांगोळी घातलेली आहे. या मुळे रोज अपघात घडत आहेत.नागरीकांची रहदारीची खुपच गैरसोय होत आहे.याच चौकादरम्यान विविध महाविद्यालये, व शाळेत जाणारे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुप आहे.यामुळे या ठिकाणी चौकात मोठ्या प्रमाणात वर्दळ होत आहे. या ठिकाणी गर्दी करून नगरपरिषदेला काय साध्य करायचे आहे.तरी अशा चुकीच्या पध्दतीने कन्सल्टींग इंजिनिअरने डिझाईन करून या मोठ्या जागेचे वाटोळे केलेले आहे.
संबंधीत या चौकातील पुलावर प्रत्यक्ष कन्सल्टींग इंजिनिअर अधिकारी यांनी गर्दीच्या वेळेस स्वतः समक्ष हजर राहुन प्रात्यक्षित तपासावे व त्यावर त्वरीत उपाय योजना करण्यात यावी. यापुढे अपघात होवून जीवीत हानी व वित्त हानी झाल्यास त्यास कन्सल्टींग एजन्सी व नगरपरिषद प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहतील याची आपण कृपया गंभीर नोंद घ्यावी.अन्यथा आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असे निवेदनात म्हंटले असून यावेळी सौ. सुवर्णा जगताप शहराध्यक्ष,भाजप महिला आघाडी,सुरेखा गरजे, शिल्पा ठोंबरे, जयश्री कसबे,सुनीता राणे,दिपाली शेगर,संजना बारते,शहाजी कदम,अँड.अक्षय गायकवाड,प्रमोद डिबळे पाटील,संतोष जाधव,बापू लोखंडे,मुकेश वाघेला, मुन्नाभाई तांबोळी,संजय गिरमे, सुभाष वाकळे सह अनेकजण उपस्थित होते.
*बारामतीतील नागरिक बोलताना म्हणतात की गेली अनेक वर्षांपासून चौकातील सिग्नल चालू करावेत त्याच बरोबर cctv बसवावे अशी मागणी करीत आहे.तसेच विनाकारण पोलिसांवर आलेला ताण कमी होईल*
No comments:
Post a Comment