बारामतीत नायलॉन मांजा विक्रते वर कारवाईसाठी निवेदन सादर..
बारामती:- पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती यांना बारामती शहर नायलॉन मांजा विक्रतेवर कायदेशिर कारवाई करणेबाबत निवेदन साईच्छा सेवा ट्रस्ट बारामती यांनी नुकताच बारामती शहरातील रहिवाशी यांनी दिले पुढील काही दिवसानंतर नागपंचमी सण येत आहे. सदर सण साजरा करताना,अबाल वृद्ध व तरूण पंतग उडविण्याचा आनंद घेत असतात,आनंद घेताना ते पंतग हवेत उडविण्यासाठी सर्वजन हल्ली नायलॉन धागा (मांजाचा) वापर मोठया प्रमाणात करतात. मांजा उघडया डोळयानी सहजासहजी दिसून येत नाही. त्यामुळे पंतग रस्तावर उडवताना अखेर मांजा न दिसल्यामुळे गाडी चालविणारे यापुर्वी गळयाला मांजा कापुन मृत्युमुखी पडलेले आहेत. याशिवाय हवेतील उडणा-या पंतगामुळे आकाशातील बरेच पक्षी प्रतिवर्षी मरण पावत आहेत.सदर बाबींची चालूवर्षी पुनरावृती होवू नये व कोणत्याही स्वरूपातील जिवित हानी होवू नये म्हणून बारामती शहरातील होलसेल व किरकोळ नायलॉन धागा विक्रते वर कायदेशिर कारवाई करणेत यावी. तसेच पंतग उडविणा-या व्यक्तीना समुपदेशन व्हावे .असे निवेदन केदार भाऊ पाटोळे. पप्पु भाऊ खरात. किरण भाऊ बोराडे. बाबा शेठ घोडके. अनिता ताई गायकवाड. ललिता ताई जाधव. उशाताई भोसले. विजया ताई आळिंगी.ओंमकार जगताप. किरण तुपे यांनी बारामती शहर पोलिस स्टेशनला तक्रारी अर्ज देण्यात आला.
No comments:
Post a Comment