महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त बारामतीमध्ये रक्तदान व वृक्षरोप वाटप तसेच रुग्णांना फळे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा संदेश देत आयोजन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 17, 2024

महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त बारामतीमध्ये रक्तदान व वृक्षरोप वाटप तसेच रुग्णांना फळे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा संदेश देत आयोजन...

महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त  बारामतीमध्ये रक्तदान व वृक्षरोप वाटप तसेच रुग्णांना फळे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा संदेश देत आयोजन...
बारामती:- बारामती येथे ईद ए मिलादून नबी महंमद पैगंबर (स)साहेब यांच्या जयंती निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य रक्तदान तसेच ज्योतीचंद भाईचंद सराफ बारामती यांच्या सौजन्याने फातीमा मशीद, शगणशाहा मशीद, चांदशाह वली दर्गा मशीद येथे वृक्षरोप वाटप तसेच सिल्वर ज्युबली दवाखान्यात रूग्णांना फळे वाटप व मराठी दिव्य कुराण वाटप व भेट दिले...प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांचे दिव्य वचन आहे कि.."ज्याने एखाद्याचा जीव वाचवला,, त्याने जणू समस्त मानव जातीला जीवन प्रदान केले"
याच वचनाचा आधार घेत  बारामती मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेत एक संदेश दिला कि मानवी नाते हे रक्ताला बांधील असते.रक्ताला फक्त एकच रंग असतो तो म्हणजे फक्त लाल,जेव्हा माणसाला रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा रक्ताच्या पिशवीला जातीचे धर्माचे लेबल नसते..
असते ती फक्त मानवी रक्ताची गरज हि गरज फक्त मानवच पुर्ण करू शकतो. आणि ते पूर्ण करने ही माणुस म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून.. 
स्व .माणिक बाई चंदूलाल सराफ ब्लड बँक यांच्या सौजन्याने बारामती येथे *रक्तदान शिबिराचे आयोजन करून १०० बाटल्याचे संकलन केले.तसेच सर्वच समाज घटकांना इस्लाम धर्माविषयी समज- ज्ञान , गैरसमज-अज्ञान हे दुर व्हावे या हेतुने तसेच वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान व माहिती प्राप्त व्हावी अश्या पध्दतीने नेहमी 
प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) जयंती "ईद ए मिलादून्नबी  " साजरी करून संपूर्ण  विश्वाला मानवतेला उच्चतम आदर्श घालून देण्याचा बारामती मुस्लिम बांधवांनी प्रयत्न केला व नेहमीच राहणार आहे,
 तसेच या रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव व युवक वर्ग यांनी परिश्रम घेतले यांच्या सह विषेश बाब म्हणजे बहुजन हिंदू समाजातील बांधव , अमय गुळूमकर , कृष्णा वारे, शंभू मोरे, सोमनाथ कवडे,योगेश महाडिक, चिऊशेठ जंजिरे, अनिकेत मोहीते , विष्णूपंत चव्हाण, विठ्ठलशेठ आगवणे यांनी सुध्दा सहकार्य व रक्तदान करून हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा संदेश दिला हे अभिमान व  कौतुकास्पद होते. या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला. 

No comments:

Post a Comment