चर्च ऑफ ख्राईस्ट बारामती यांच्या संस्थेच्या कॉन्फरन्स सदस्य या पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकाच पॅनेलचे बारा सदस्य विजयी..
बारामती:- बारामती मधील चर्च ऑफ ख्राईस्ट बारामती यांच्या संस्थेच्या कॉन्फरन्स सदस्य या पदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन पॅनेल निवडणूक लढवित होते.पूर्वी पासून अस्तित्वात असलेले ( प्रस्थापित )लोकांचा पॅनेल विरुद्ध सध्या निवडून आलेला नवीन लोकांचा पॅनेल अशी लढाई झाली.परंतू नवीन पॅनलने जुन्या प्रस्थापीत लोकांच्या पॅनलचा धुव्वा उडवून आपले सर्वच्या सर्व 12पैकी 12उमेदवार निवडून आणले. लोकांनी नवीन लोकांना संधी देत जुन्या प्रस्थापित लोकांचा पराभव केला.नवीन निवडून आलेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे 1)जयकुमार महादेवराव काळे 2)विवेक मधुकर साळवी 3)सचिन प्रेमचंद जाधव 4)राजेश शांतवान जाधव 5)नितीन बहिरु जाधव
6)सुनील सॅमवेल दुबे 7)राजू डेविड नॉर्टन
8)विलास शिवलाल गायकवाड 9)शशिकांत दौलतराव वागळे 10)विश्रांतीबाई शंकर जाधव
11)नितीन उल्हास कारभारी 12)अरविंद शिवाजीराव जाधव अशी आहेत. सदर पॅनेल चे नेतृत्व समाजातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व निलेश कुलकर्णी आणि बारामतीच्या राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व जयकुमार काळे यांनी केले.
No comments:
Post a Comment