धक्कादायक..बारामतीत पहाटे अंगण झाडताना करायचा जब्बरदस्तीने लैगिंक अत्याचार,शिवाय तक्रार केल्यास जीवे मारण्याची द्यायचा धमकी..!
बारामती:-बारामतीत बलात्कार होत असल्याच्या तर कुठं बलात्कार झाला अश्या खोट्या तक्रारी तर कुठं बलात्कार केला अशी धमकी देऊन समोरच्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या तक्रारी दाखल होत आहे, नक्की बारामतीत चाललंय काय हे समजण्यापलिकडे आहे, पण घटना का घडल्या याचा शोध सुरू असला तरी त्या होऊ नये यासाठी कडक कायदे गरजेचं आहे, नुकताच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आली त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडिताचे नाव व पत्ता टाकता येत नाही, दिनाक.जुलै 2024 (नक्की तारीख आठवत नाही) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ते दिनांक 12/09/2024 रोजी चे दरम्यान फिर्यादीच्या घरी *** बारामती ता. बारामती जि.पुणे या ठिकाणी यातील आरोपी याने दोन ते तीन वेळा फिर्यादी यांचे राहते घराशेजारी बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जेव्हा उठून घरासमोरील अंगण झाडायला घराबाहेर जायची त्यावेळी यातील आरोपी याने फिर्यादीच्या मुलीचे अंगावरील कपडे काढून तिचे अंगावर झोपून वरून पांघरून घेऊन तिचे तोंड दाबून जबरदस्ती करून शारीरिक संबंध केले व तिस गरोदर केले व तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलीला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली आहे म्हणून यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरून बारामती शहर पो.स्टे.गु. रजि नं. 689/2024 BNS 64(2)(m)64(2)(f)4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास महिला पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहे.
No comments:
Post a Comment