बारामतीत वाढतेय महिला सावकारी..गुंडा कडून दिली जातेय धमकी.!
बारामती:-बारामतीत सद्या गुन्हेगारी वाढलेली असली तरी यामध्ये महिला सावकार जास्त फार्मात आहे,आपल्या पतीने कमविलेल्या काळ्या पैशाची वाट दहा टक्के दराने अडल्या नडल्या व्यक्तीला,गरजू महिलेला देऊन त्याच्याकडून दहा टक्क्यापेक्षा जास्त व्याजाने पैसे देऊन लावतात,त्यांना उचलून नेऊ, गुंडाकडून मारण्याची धमकी देऊन जब्बरदस्तीने पैसे अथवा वस्तू, गाड्या ओडून नेण्याचे काम चालू असल्याचे काही महिला सांगतात मात्र याची तक्रार करण्यास गेला तर दखल घेत नसल्याने व आमच्या जीविताला धोका झाल्याने नाईलाजाने सावकारी जाचाला सामोरे जात असून त्यांना अश्या अनेक प्रकारे होणारा मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे,या सावकारी करणाऱ्या लोकांना कोण अभय देतंय हे लवकरच सविस्तरपणे मांडणार आहोत तश्या लेखी तक्रारी येत असल्याचे व काही तक्रारी दाबल्याचे कळतंय. तरी काही तक्रारी असतील तर त्यांनी पुढे यावं असं आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment