बारामतीत नक्की चाललंय काय..आधी केलं कौतुक आत्ता निषेध,उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कटाऊटला लावले काळे कापड..!
बारामती :- बारामतीत आधी केलं कौतुक आत्ता केला निषेध यावरून राजकीय वातावरण तापले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरवर काळे कापड लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनीच हे केल्याने शहरात तणाव सदृश्य चर्चांणा
उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित
कार्यक्रमाला न आल्याने जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोला काळ्या कापडाने झाकुन निषेध केला.दरम्यान तणाव वाढण्याची शक्यता
पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करीत पवारांच्या फोटोवर काळे कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात
घेतले.सुरेंद्र जेवरे यांनी गणेशोत्सवानिमित्त
शारदा प्रांगण येथे एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची कमान बारामतीच्या मुख्य चौकात लावण्यात आली होती त्यावर महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे भले मोठे कटआउट लावण्यात आले होते त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही
उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. त्या कटआउटमधील उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या कटआउट वर काळे कापड
लावून जेवरे यांनी अजित पवारांचा
निषेध केला.दरम्यानच्या काळात तणाव निर्माण
झाल्याने नगरपालिकेने त्या कमानीवर
कटआउट काढण्यात आले होते त्यामध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही
उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते ते तिन्ही
फोटो कामानिवरून उतरवून ताब्यात
घेतले.यादरम्यान भिगवण चौकात तुडूंब गर्दी झाली होती काही दिवसांपूर्वी दिमाखात लावलेले व इतर कमानीं फिक्के पडतील असे मोठे कमानी लावले गेल्याने बारामतीत चर्चा रंगत होत्या पण काही अल्पशा वेळेतच हे भले मोठे कटाऊट काढल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते यावेळी त्यांनी सुरेंद्र जेवरे चे फोटो कटाऊट फाडले असल्याचे दिसत होते मात्र हे सर्व घडले यामागे काय व कोणता हेतू असावा अशी चर्चा रंगत असतांना महायुती मध्ये ठिणगी पडली ती ही चक्क बारामतीत याचीच जास्त चर्चा चालू होती, तर दुसरीकडे शारदा प्रांगणात सुट्टी च्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये तसा ठराव देखील करण्यात आला आहे, मात्र अलीकडे आपल्या बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकारी लाभले ते कुणालाही आणि कितीही दिवस परवानगी देत असल्याचे दिसत असून त्यांचे बहुजन वर्गातील शिकत असलेल्या मुलांना मात्र खेळाच्या मैदानातुन बाजूला सारण्याचा एक प्रकारे जणू कायदा च केला की काय?अशी शंका निर्माण होत असल्याचे बोलले जात असून याबाबत अनेक वेळा तक्रारी करून ही त्याची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment