गब्बरच्या पत्रावर खासदारांची प्रतिक्रिया बारामतीकर हुशार,योग्य निर्णय घेतील..
बारामती:-नुकताच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना संकेत दिले होते? त्यावरून तर्क वितर्क काढण्यात आले,
आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार का?
याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच सोशल मीडियावर गब्बरच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे.
या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्यात
आला आहे. व्हायरल पत्रात आगामी विधानसभा
निवडणुकीत अजित पवार यांना पराभव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा पत्र कुणी व्हायरल केला आणि का? याबाबत
सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.तर आता या व्हायरल पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत बारामतीकर हुशार असून ते योग्य निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, पत्र मी पाहिले नाही आणि वाचले देखील नाही. अजित पवार यांनी 1988-89 पासून बारामतीचा चेहरा मोहरा बदल्यासाठी मोठा योगदान दिला आहे. 1991 मध्ये ते संसदेत गेलेआणि शरद पवार साहेब जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा अजित पवार विधी मंडळात आले.त्या वेळेपासून तर आजपर्यंत दादांनी ज्या पद्धतीने बारामती घडवली, आज देशात बारामतीला रोलमॉडेल
म्हणून पाहिले जात आहे. त्यामध्ये सर्वात जास्त वाटा अजित पवारांचा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच बारामतीकर हुशार असून ते या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील आणि मोठ्या फरकाने पुन्हा एकदा आम्हाला यश मिळेल असा
विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या व्हायरल पत्रात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नेहमी बारामतीकरांनी प्रेम केले असून मतदान रूपी आशीर्वाद दिल्याचे नमूद करण्यात आले
आहे. तसेच स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांना तडाखा देण्यासाठी अजित पवार यांची बदनामी करून त्यांना राजकीय पायउतार करण्याचा डाव खेळला जात आहे असा आरोप देखील या व्हायरल पत्रात करण्यात आला आहे.याच बरोबर सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार
यांना राजकीय शर्यतीतून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा दावा देखील या व्हायरल पत्रात करण्यात आला आहे. तसेच या पत्रात काही स्थानिक नेत्यांचां देखील उल्लेख करण्यात आला आहे.हे भलतेच चर्चेत आल्याने उधाण आले आहे.
No comments:
Post a Comment