प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लिव्हिइन रिलेशनशिपची नोटरी करून जब्बरदस्तीने केला अत्याचार..बारामतीत गुन्हा दाखल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 1, 2024

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लिव्हिइन रिलेशनशिपची नोटरी करून जब्बरदस्तीने केला अत्याचार..बारामतीत गुन्हा दाखल.!

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लिव्हिइन रिलेशनशिपची नोटरी करून जब्बरदस्तीने केला अत्याचार..बारामतीत गुन्हा दाखल.!
बारामती:-बारामती तालुक्यानजीक भिगवण येथील एका पीडित मुलीने नुकताच फिर्याद दाखल केली या दाखल फिर्यादीत म्हंटले की, मी आई वडील, भाऊ यांचेसह राहणेस आहे. मी माझ्या शिक्षणाबरोबर पार्लर ही चालवत आहे.
मी 2020-2021 साली इंग्लिश मेडीयम स्कुल आणि कॉलेज या ठिकाणी अकरावीमध्ये शिकत होते. तेव्हा राजेगाव ता. दौंड जि. पुणे येथील नासीर सिंकदर मुलाणी(शेखलाल)हा 12वी मध्ये शिकत होता. तेव्हा माझी व त्याची ओळख झाली होती. आमचे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी नासिर याने मला राजेगाव येथील विठठल मंदीर व परीसरात एक दोन वेळेस फिरायला घेवुन गेला होता त्यावेळी त्याने माझे ** घेतले होते व त्याचे व्हीडीओ बनविले होते काही व्हीडीओ मध्ये त्याने एडीट पण केले होते. त्यानंतर साधारण दोन तीन महिन्याची माझ्या व नासिरच्या संबंधाबाबत माझ्या घरच्यांना समजले तेव्हा त्यांनी विरोध केला होता म्हणुन आम्ही आमचे संबंध थांबवले होते. जुलै 2023मध्ये मी माझ्या व्यवसायाच्या अनुशंगाने दुकानाचे काम चालु केले होते तेव्हा तो (नासिर) मला पुन्हा दिसु लागला. तेव्हा तो माझ्याकडे बघुन तो हसायचा व माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा मी त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हते तेव्हा तो मला माझे काढलेले व्हीडीओ व फोटो जे की नासिर यांने आक्षेपार्ह रितीने काढलेले होते व एडीट केले होते याबाबत बोलुन मला ब्लॅकमेल करत होता व माझ्याशी लगट करायचा प्रयत्न करत होता तसेच माझ्या आई वडीलांना व भावाला मारण्याची धमकी देत होता त्यामुळे मी पुन्हा त्याच्याशी बोलु लागले त्यावेळी त्याची मेव्हणी *** **** ता. इंदापुर जि. पुणे ही स्वता त्याचेशी संबंध ठेवण्यासाठी फोर्स करायची *** हिने नासिर याला भेटण्यासाठी बारामती मध्ये बोलावुन आमची भेट घडवुन आणली होती. नोव्हेंबर 2023मध्ये भिगवण येथील आनंद लॉज येथे आमचे पहिल्यांदा शारीरीक संबंध आले होते त्यानंतर साधारण फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा आनंद लॉज वर गेले माझे व नासिरचे शारीरीक संबंध आले होते. आनंद लॉज हे नासिरच्या मित्राचे होते त्यामुळे त्याठिकाणी कोणतीही नोंद घेतली नाही.20मार्च 2024 रोजी नासिर याने माझ्याशी लग्न करण्यासाठी मला बारामती येथे बोलावले व तेथुन मला त्याने इंदापुर येथे रजीस्टर लग्न करायचे आहे असे सांगुन मला इंदापुर येथे घेवुन गेला व त्याठिकाणी रजीस्टर लग्नासाठी केलेले कागद मला वाचण्यासाठी न देता जबरदस्तीने माझी समंती घेतली यासाठी *** *** रा. भिगवण व *** **** रा. बंडगरवाडी यांनी मदत केली होती. सदर कागदपत्रे त्याने मला न देता समीर पठाण रा. भिगवण यांच्याकडे ठेवण्यास दिले होतेमे 2024 मध्ये नासिर हा पुण्यातुन तरकारीची आयशर टेम्पो घेवुन आला होता तेव्हा मला त्याने भिगवण भाजी मंडई मध्ये बोलाविले होते व टॅम्पो मध्ये बसवुन अकलुज येथे घेवुन गेला त्यादिवशी अकलुज मध्ये त्याच्या मालकाच्या घरी (नाव माहीत नाही) राहिलो दुस-या दिवशी मी व नासिर असे नासिरच्या मावशीचे मुलीचे गाव जे की अकलुज पासुन 8 ते 10 गावे पुढे होते. त्याठिकाणी घेवुन गेला व सदर ठिकाणी त्याची मावशीची मुलगी व तिचे नातेवाईक यांचे समोर आमचे मुस्लिम धार्मिक विधी करण्यात आले. त्याचदिवशी नासिरची आई **** ***  व त्याचे नातेवाईक आम्हांला राजेगाव येथे घेवुन आले त्यावेळी **** *** हिने मला माझ्या कुटुंबियाच्या विरोधात तक्रार द्यायची व माझ्या मुलाच्या बाजुने रहायचे असे मला बिंबवण्यात आले होते.त्यामुळे मी माझ्या आई- वडीलांच्या विरोधात बोलत होते. परंतु त्याच दिवशी माझे आई वडील मला आमच्या घरी घेवुन आले त्यावेळी नासिर याने माझ्याकडील सोन्याची चैन ब्रेसलेट कानातले व अंगठी माझ्याकडुन काढुन घेतली त्यानंतर मी भिगवण मध्येच राहत होते माझा चुलत भाऊ *** ***** रा. मुक्तीविहार जळोची व नासिर याची,चांगली मैत्री आहे. त्यामुळे माझा भाउ *** याने मला जळोची बारामती येथे घेवुन आला. मी साधारण दोन महिने माझा भाउ  व काकु *** *** ** यांच्याकडे राहिले. त्यावेळी भाऊ व काकु *** यांनी पुन्हा मला नासिर यांचेशी संबंध ठेवण्यासाठी मला भाग पाडुन नासिरला मदत केली त्यामुळे मी पुन्हा नासिरकडे ओढले गेले मी
जळोची येथे राहत असताना *** काकु मला दारु पाजायची त्यावेळी नासिर माझ्या काकुला पैसे देत होता त्यावेळी काकुने मला इतर पुरुषांशी संबंध ठेवशील का असे विचारले होते त्यावेळी मी नकार दिला होता त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 रोजी मी व नासिर असे बारामतीतील तांबे नगर सिटी इन चौक जवळ राहण्यास आलो. त्याठिकाणी नासिर माझ्यावर अत्याचार करुन जबरदस्तीने ब-याच वेळा शारीरीक संबंध करायचा मला घरच्याशी बोलायला द्यायचा नाही. त्यावेळी त्याचा मालक व मालकाचा मुलगा व इतर  रा. भिगवण हे घरी यायचे हे सर्वजन माझ्यासमोर अश्लिल बोलायचे व माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघायचे तसेच नासीर व **** *** यांनी घरी मांस आणुन मला जबरदस्तीने
खायला हाणमार करुन घातले होते. सदरचा सर्व प्रकार मला असह्य होत असल्याने दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मी नासिर घरी नसताना मामाला फोन करुन बोलावुन घेतले व मामाबरोबर 2 सप्टेंबर रोजी पुण्याला गेले. त्यानंतर सदर घटनेने माझे मानसिक संतुलन स्थिर नव्हते म्हणुन मला तक्रार करता आली नाही आज रोजी माझे मानसिक संतुलन ठिक झाले असल्याने मी आज रोजी तक्रार करण्यास आली आहे मला पुण्याला घेवुन गेल्यावर माझ्या आई-
वडीलांना व मामाला मारुन टाकण्याची धमकी देत होता.तरी नासिर मुलाणी त्याने सन 2020 ते 2 सप्टेंबर 2024 पर्यंत मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन माझे आक्षेपार्ह व्हीडीओ व फोटो काढुन त्यात एडीट करुन व्हायरल करण्याची धमकी देवुन तसेच कुटुंबियाला मारण्याची धमकी
देवुन जबरदस्तीने माझ्या मनाविरुध्द लिव्हिइन रिलेशन शिपची नोटरी करून माझ्याशी जबरदस्तीने मनाविरुध्द आनंद लॉज भिगवण, मुक्तीविहार जळोची, व तांबे नगर बारामती या ठिकाणी शारीरीक संबंध करुन अत्याचार केला
तसेच यासाठी नासिरची आई परवीन मुलाणी,भाउ हर्षद पालकर, काकु सोनाली मोरे व इतरांनी त्यांना मदत करुन माझ्यावर अन्याय व अत्याचार केले आहेत म्हणुन त्याचेविरुध्द तक्रार करीत आहे ,वैशाली पाटील पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे यांच्या समक्ष फिर्यादी जबाब दिला आहे.यानुसार बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण 8 अधिनियम, २०१२,बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२- 12,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 64,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023- 64 (2) (m),भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 49,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 74,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 78,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 3(5), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
351(2) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.