बारामतीत RTO कार्यालयात का बांधली घंटा..नागरिक समाधानी आहे का?
बारामती:- विकसित बारामतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यावर आलेला अनुभव.. *आपली सेवा करण्याची आम्हास संधी दिल्याबद्दल धन्यवाद..आमच्या कामाबद्दल आपणास आमच्याकडून मिळालेला वागणूकीबाबत आपण समाधानी असाल तर हि घंटा वाजवून आम्हाला दाद द्या. जेणेकरुन आपली आणखी चांगली सेवा करण्यासाठी आम्हास उर्जा मिळेल.आपण आमच्या कामाबद्दल,आमच्याकडून मिळालेल्या वागणूकीबाबत असमाधानी असाल तर कृपया तक्रारपेटीत आपली तक्रार, सुचना लिहून टाका किंवा आस्थापना शाखेतील तक्रार नोंदवहीत आपली तक्रार नोंदवा, अथवा सहाय्याक /उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन आपली तक्रार मांडा जेणेकरुन आम्हास सुधारण्याची संधी मिळेल. धन्यवाद !...उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती.* अशा आशयाचा फलक कार्यालयाच्या मेन दरवाजा जवळ लावला असून भला मोठा घंटा त्या ठिकाणी बांधण्यात आला आहे जेणेकरून या कार्यालयातील कामावर आपण समाधानी आहात व त्याबाबत आपला घंटा वाजवुन प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होती, परंतु याठिकाणी येणाऱ्या ग्राहक हा कदाचित समाधानी नसावा अशी सद्याची परिस्थिती दिसत आहे, कारण कुणी घंटा वाजवताना दिसत नाही की ऐकव्यास येत नाही मात्र खाजगीत चर्चा होताना दिसते की येथे एजंटची चलती आहे, त्याच्याशिवाय पान हलत नाही हे मात्र नक्की चर्चेतून ऐकव्यास येत असल्याचे कळतंय. बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना RTO कार्यालय हे भव्यदिव्य बांधले असून याठिकाणी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी मात्र हवी अशी तत्परता दाखविली जात नसल्याचे दिसत आहे. कारण कोणतेही काम एजंट मार्फत होणार असेल तर काय करायचं. आर्थिक झळ मात्र सर्वसामान्य लोकांना बसते ते वेगळेच शिवाय राजरोसपणे ओव्हर लोड वाहने वाहतूक होत असताना त्याच्यावर कारवाई होत नाही हे वेगळंच अशी अनेक कारणे पुढील भागात मांडणार आहोत.
No comments:
Post a Comment