गॅस माफियाराज वाढतोय कानाकोपऱ्यात;खुलेआम गॅस विक्री होतेय.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 30, 2024

गॅस माफियाराज वाढतोय कानाकोपऱ्यात;खुलेआम गॅस विक्री होतेय..

गॅस माफियाराज वाढतोय कानाकोपऱ्यात;खुलेआम गॅस विक्री होतेय..
बारामती:- घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस
सिलिंडरचे दर गगनाला भिडत असताना,
दुसरीकडे याच घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लपूनछपून हॉटेल व्यावसायिकांकडून तर वापर केला जातोच, याशिवाय वाहनांमध्येही घरगुती
गॅस भरून देण्याचे शहरात खुलेआम अड्डे सुरू आहेत.आडोशाला गॅसचा काळाबाजार चालू असल्याचे समजतंय,महसूल विभाग व  पोलिसांनी अश्या काळाबाजारातील गॅस विक्री करणाऱ्या वर कारवाई करणे गरजेचे आहे मात्र तसं होताना दिसत नसल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.काही महिन्यांपूर्वी अकराशे रुपयांपर्यंत पोचलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजमितीस ८२० रुपये आहे.एका सिलिंडरमध्ये १४ ते १५.५ किलो गॅस असतो,वाहनांसाठीच्या गॅस पंपावरील प्रतिकिलो ८५ रुपये आहे, सिलिंडरमधील गॅस काळाबाजारात ८० ते ९० रुपये किलो विकला जातो तर वाहनांसाठीच्या गॅसच्या तुलनेमध्ये घरगुती गॅसचा वापर केल्यास त्यामुळे वाहनांचा प्रतिकिलोमीटर अधिक अॅव्हरेज मिळतो- घरगुती एका सिलिंडरमधील गॅसवर वाहन किमान २५० किलोमीटर अंतर चालते,विशेषतः गॅसवरील वाहनचालकांकडून घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसला अधिक मागणी असते.
पूर्वी गॅस एजन्सीकडे असणारे सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडील सिलिंडरमधून प्रत्येक सिलिंडरमधून अर्धा ते एक किलोचा गॅसची चोरी
करायचे- परंतु यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती आली आहे.ग्राहक अनेकदा गॅसचे वजन करून घेत असल्याने असे प्रकार बहुतांशी प्रमाणात बंद झाले.काळाबाजार करणारे मोठ्याप्रमाणात रिकामे सिलिंडर विकत घेतात,डिलिव्हरी बॉयकडून जादा दराने गॅस सिलिंडरच विकत घेतात. बहुतांशी ग्राहकांचा वापर कमी असल्याने अशा ग्राहकांच्या नावावरील सिलिंडर काळाबाजारात विकले जाते,
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यवसायाकरिता
वापरण्यास बंदी आहे. असे असतानाही शहरात रस्त्यावर चहाटपरी, हॉटेल,खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती सिलिंडरचा वापर खुलेआम केला जातो.तर दुसरीकडे बाहेर गावाहून आलेल्या लोकांना गॅस पुरवठा केला जातो.काही वेळा बाहेरच्या तालुक्यातून एजन्सी कडून गॅस ची गाडी मागवून घेतली जाते व तो शहरी भागात फॉर व्हीलर, टू व्हीलर गाड्या तुन पोहच केला जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबत कारवाई होईल का नाही हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

No comments:

Post a Comment