ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती..
बारामती:-केंद्रीय विधी व न्याय विभाग,भारत सरकार यांचे वतीने नोटरी पदी नियुक्ती कामी यादी दिनांक.२७ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये बारामती शहरातील ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मेघराज नालंदे हे बारामती न्यायालयात गेल्या बारा वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, त्यांच्या नियुक्तीचे बारामती शहरात तसेच आसपासच्या तालुक्यासह परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.तर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment