निमित्त एकमेकांकडे पाहण्याचं, हल्ला मात्र कोयत्याचा..
बारामती:-बारामतीत गुन्हेगारी घटविण्याचा प्रयत्न चालू असताना कोयत्याने हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे,नुकताच अशी घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावातील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या गेट समोर घडली. सुरू असलेली भांडणे सोडवायला गेला त्याचा राग मनात धरून कोयत्याने वार करीतगंभीर जखमी केल्याची घटना घडली,यामध्ये निलेश रामदास जगदाळे,वय.२१ वर्षे (रा.जगताप आळी,पणदरे, ता. बारामती, जि. पुणे)असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. निलेश जगदाळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम१०९,३५१(३),११७(४),१८९(२),१९०(२),१९१(शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ या विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.यात तीन हल्लेखोर विधी संघर्षित मुलांना
ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे मधील नव महाराष्ट्र विद्यालय येथून फिर्यादी जात असताना,कॉलेज गेटच्या आत काही मुलांमध्ये भांडण सुरू असल्याचे निदर्शनास आले.जगदाळे यांनी गेटच्या आतमध्ये जाऊन पाहिले असता, एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून भांडणे सुरू असल्याचे समजले.त्यानंतर भांडणे मिटवायची म्हणून पणदरे परिसरातील सुतगिरणी येथे भांडणे मिटवण्यासाठी गेल्यावर आरोपींनी पुन्हा भांडण करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूच्या युवकावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.याप्रकरणी हल्लेखोर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांची रवानगी बाल न्यायालय पुणे येथे केली. यातील उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment