बारामती पोलिसांनी कारवाईची घेतली होती हमी.! म्हणूनच गुन्हे घडण्याची संख्या होतेय कमी.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 25, 2025

बारामती पोलिसांनी कारवाईची घेतली होती हमी.! म्हणूनच गुन्हे घडण्याची संख्या होतेय कमी.!!

बारामती पोलिसांनी कारवाईची घेतली होती हमी.! म्हणूनच गुन्हे घडण्याची संख्या होतेय कमी.!!
बारामती :-बारामतीत नुकताच पोलीस विभागाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यादरम्यान  त्यांनी पोलीस विभागाने शक्ती अभियान सुरू
केल्यानंतर महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन
राठोड, पोलिस निरीक्षक विलास नाळे,
वैशाली पाटील, चंद्रशेखर यादव आदी
याप्रसंगी उपस्थित होते.बारामती विभागामध्ये मागीलवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या घटल्याची
माहिती देत गणेश बिराजदार यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेत दिली. खून,खूनाचा प्रयत्न, दुखापत, मारामारी,जबरी दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी
चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत असलेल्या आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.बारामती विभागामध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची संख्या देखील वाढवली असून विविध कलमान्वये
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले. शक्ती अभियानाअंतर्गत पोलिसांनी दिलेला शक्ती नंबर सर्वांकडे गेल्यामुळे लोक तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे यामुळे कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. शक्ती नंबरवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर पोलिस विभाग कारवाई
करीत आहे. आत्तापर्यंत ११९ शाळा महाविद्यालयांना पोलिसांनी भेट दिली
असून ५२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोलिस
पोचले आहेत. मोबाईलवर ११४० तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी प्रत्येक तक्रारीवर पोलिसांनी योग्य ती कार्यवाही केली आहे. वाहतूक नियंत्रण करण्याच्या दृष्टीने देखील बारामती शहरात पोलीस विभाग कार्यरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. वाहतूक विभागाच्या कारवाईची आकडेवारी त्यांनी दिली.दरम्यान कोयता वापरणाऱ्यांसह कोयता पुरवणाऱ्यांवर देखील या पुढील काळात कारवाई केली जाणार आहे, तसेच सोशल मीडियावर शस्त्र प्रदर्शन करतील त्यांच्यावर देखील पोलिस कठोर
कारवाई करणार असल्याचा इशारा सुदर्शन राठोड यांनी दिला.यावेळी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत पोलीस खात्याचे काम चांगले चालू असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment