बारामतीचे गणेश महादेव गायकवाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर..
पुणे:- टकारी समाजाचे बारामती वसंतनगर चे सुपुत्र गणेश महादेव गायकवाड यांना नुकताच 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झाले त्यांना मिळालेला सन्मान समाजाला कौतुकास्पद आहे, याबाबत मिळालेली माहितीनुसार महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पदक जाहिर दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील खालील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून मा.राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.यामध्ये सहा जणांच्या यादीमध्ये श्री. गणेश महादेव गायकवाड, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांना पदक मिळाले,उक्त नमूद कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्यात दाखवलेली सचोटी व निष्ठा याबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेकरीता सदर सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.
सदरील सेवापदक हे नमुद अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन सेवेतील निष्ठेचा सन्मान आहे.
कारागृह विभागाचे प्रमुख मा. श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (म) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मा. राष्ट्रपतीचे सेवापदक प्राप्त नमुद अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून
अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील व बारामती टकारी समाजाच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment