नवमतदारांने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे- सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गणेश शिंदे
बारामती, दि. २५ : मतदार नोंदणीचे कार्य नियमित चालणारी प्रक्रिया असून नवमतदारांने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, नोदविल्यानंतर ते असल्याचे खात्री करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे साहेब यांनी केले.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बारामती विधानसभा मतदारसंघामार्फत धो. आ. सातव हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, निवडणूक शाखा नायब तहसीलदार पुनम दंडिले, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगरसेवक सुरज सातव आदी उपस्थित होते.
यावेळी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी , निबंधलेखन तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्याना बक्षीस वाटप, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आले. मतदारांना मतदानाबाबत शपथ देण्यात आली.
No comments:
Post a Comment