आर पी आयचा बारामती तालुक्याचा मेळावा संपन्न..
बारामती:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे सूचनेनुसार, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी शशिकलाताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती तालुक्याचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रत्नप्रभा साबळे ताई मराठा आघाडीच्या अध्यक्ष जगदाळे ताई तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशा मोहिते ताई व बारामतीच्या नवनिर्वाचित महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पूनम घाडगे इत्यादी उपस्थित होत्या बारामती तालुका व शहर युवक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीस रिपाइं रोजगार राज्य कार्यकारिणी सदस्य राहूल हरिभक्त भाजपच्या कार्यकर्त्या पिंकू ताई मोरे व सविता पवार इ. मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते पद वाटप करण्यात आली
, कार्याध्यक्ष ॲड.तुषार ओहोळ, उपाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष अशोक साळवे, सरचिटणीस आनंद काकडे, तालुका युवक अध्यक्ष वैभव जगताप , उपाध्यक्ष गणेश जाधव , युवक उपाध्यक्ष रमेश काकडे, बारामती शहर युवक अध्यक्ष मयूर मोरे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष पूनम घाडगे, यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी नगरपालिका नगर पंचायत निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा बांधण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीकांत जी कदम यांनी योजनाच्या संदर्भात विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली येणाऱ्या काळात रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी प्रकरणे आपण आपल्या स्तरावर घेऊन त्याचा कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल व विविध योजनेचा फायदा कशाप्रकारे घेता येईल याचे सुरेख मांडणी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment