महिलांनी राजा राम मोहन रॉय यांचे मानले आभार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 25, 2025

महिलांनी राजा राम मोहन रॉय यांचे मानले आभार..

महिलांनी राजा राम मोहन रॉय यांचे मानले आभार..

बारामती:-(प्रतिनिधी) केश वपन,सतीची चाल बंद करून इंग्रज सरकारच्या सहकार्याने कायद्या आणून राजा मोहन रॉय यांनी भारतीय महिलांना मानाचे स्थान दिले महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दरवाजे उघडले व आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विधवा महिलांना मकर संक्रांत निमित्त  हळद कुंकू चा मान जिजाऊ सेवा संघाच्या वतीने देण्यात आल्या बदल अनेक विधवा , परितक्त्या, अनाथ महिलांनी राजा राम मोहन रॉय,फुले दाम्पत्य यांचे आभार मानले .बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित महिलांसाठी असलेल्या जिजाऊ सेवा संघाच्या वतीने शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे महिलांसाठी संक्रांतीचे औचित्य साधत हळदीकुंकू तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, मराठा सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम,माजी नगराध्यक्षा जयश्री सातव व जिजाऊ सेवा संघ च्या उपाध्यक्षा मनीषा शिंदे, कार्याअध्यक्षा सुनंदा जगताप, सहकार्य कार्यध्यक्षा  भारती शेळके,  सचिव कल्पना माने, सहसचिव ऋतुजा नलवडे,  खजिनदार  सारिका मोरे, सखजिनदार  मनीषा खेडेकर,  विना यादव ,वंदना जाधव, उज्वला शेळके  संगीता साळुंखे, सुवर्ण केसकर, गौरी सावळे पाटील, पूजा खलाटे, राजश्री परजणे, विद्या निंबाळकर  व 
व बारामती शहर व तालुक्यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.कष्टकरी नोकरदार शेतकरी तसेच गृहणी या महिला भगिनींचे सततचे धावपळीचे जीवन रोजचा ठरलेला दिनक्रम असतो यातून चार क्षण  आनंदाचे मिळावेत, महिलांशी हितगुज व्हावे,विचारांची आदान प्रदान व्हावे या हेतूने  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सुमारे २००० महिलांनी सहभाग घेतला सर्व महिलांना अल्पोहार तसेच तिळगुळा बरोबर संक्रांतीच्या वाणाचे वाटप करण्यात आले.महालक्ष्मी देवीचे पूजन आरास व सजावट हे खास वैशिष्ट्य ठरले.आभार उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment