भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने हळदी कुंकूचे आयोजन..
बारामती:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने हळदी कुंकू आणि फनी गेम्स घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक संगीत खुर्ची पूजा निकम, डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक नयना भोसले, उखाणे स्पर्धा अलका बगाडे यांना पैठणी आणि चांदी चे नाणी बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम आयोजन कु. पिंकीताई मोरे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी केले होते. सविता ताई पवार यांनी बहुमूल्य सहकार्य लाभले. महिला अध्यक्ष सुवर्णा ताई जगताप, जेष्ठ महिला अध्यक्ष विजया ताई खोमणे, जयश्री कसबे, सविता भोई, शिल्पा ठोंबरे, सुनीता राणे, कावेरी पाटोळे, रुपाली ढोरे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम पार पाडला.यावेळीहळदी कुंकूचे औचित्य साधून महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment