76 वा प्रजासत्ताक दिन शाहू हायस्कूलमध्ये उत्साहाने साजरा..
बारामती: - श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला .याप्रसंगी प्राचार्य श्री तावरे जीआर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्य गीत गायन झाले .त्यानंतर स्काऊट आरएसपी यांच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी झाली व सभा झाली .यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली. शिक्षक श्री शिंदे सर यांनीही ये मेरे वतन के लोगो या गीताचे गायन केले. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे झाली. यामध्ये श्री सरतापे सर यांनी जेष्ठ नागरिक व महिलांचा आदर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य श्री तावरे सर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकात्मता राखण्याचे आवाहन केले .या कार्यक्रमानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला .या कार्यक्रमाचेआयोजन चित्रकला शिक्षक श्री विकास जाधव यांनी केले. प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना बक्षीस देण्यात आली. यानंतर मुलांना का वाटप केले. या कार्यक्रम प्रसंगी अनेक पालक माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. पर्यवेक्षक श्री सुतार सर यांनी आभार मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव एस एम यांनी केले.
No comments:
Post a Comment