पंजाब या ठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाकडून प्रांतांधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 29, 2025

पंजाब या ठिकाणी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाकडून प्रांतांधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी..

पंजाब या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाकडून प्रांतांधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी..
बारामती: -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृतसर पंजाब या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्याची समाजकंटकाने घोर विटंबना केल्याचे निषेधार्थ येथील रिपब्लिकन पक्षाचे वतीने निषेध करण्यात आला असून विविध मागण्याचे निवेदन प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले. 
या निवेदनामध्ये पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ फाशी देण्यात यावी, पुतळा विटंबना घटनेची सविस्तर चौकशी करून या षडयंत्रात सामील असणाऱ्या सर्व लोकांवर कडक कायदेशीर करावी,  पुतळा विटंबनेच्या प्रकरणात अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पंजाब पोलिसातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करावे व त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी, या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंजाब गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा व पंजाब सरकार बरखास्त करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले
       यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, महिला आघाडी उपाध्यक्ष रत्नप्रभाताई साबळे, रिपाई जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, रिपाइं तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडाळे, सरचिटणीस अनिल लांडगे , महिला आघाडी प.म. संघटक सुनिता जाधव, तालुका अध्यक्ष पूनम घाडगे,युवा शहराध्यक्ष मयूर मोरे, रिपाई तालुका कार्याध्यक्ष ॲड.तुषार  ओहोळ, सरचिटणीस आनंद काकडे, रिपाई रोजगार आघाडीचे राहुल हरिभक्त, आदींच्या वतीने सदरील निवेदन देण्यात आले.
 सदर निवेदन प्रांतांधिकारी मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र मुख्यमंत्री नामदार
. देवेंद्र फडणवीस,राज्यपाल पंजाब सरकार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले,यांना पाठवण्यात आले. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयजयकार घोषणा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment