तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावु; अजितदादा पवार
बीड:- अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले असता त्यांनी बोलताना म्हंटले की,जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील. तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येत आहेत.
या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.गुरुवारी ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये होते. या
बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखठोख भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला.तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता मग आपल्या भागातील विकासकामांसाठी तशी भावना तुमच्या मनात
का नाही? विकासकामे करताना आपल्या भागाबद्दल तुमच्या मनात आपलेपणा का नाही? आता सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे येऊन मला भेटतात.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हे लोक दुसऱ्याच पक्षात होते. मात्र, आता येऊन सांगत आहेत की,दादा मी तुमच्यासोबतच आहे. हे असं चालणार नाही. मी
काही दिवस तुमचं वागणं-बोलणं बघेन. प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात.पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत
कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला,असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलंय.एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन.पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment