लोकन्यायालयात 7 हजार 383 खटले निकाली तर साडेपाच कोटींची वसुली..
बारामती:- बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय येथे शनिवार दि. 23 मार्च रोजी झालेल्या लोक अदालती मध्ये दाखल पूर्व व दाखल असे एकूण 7383 खटले निकाली निघाले.सर्व मिळून 5 कोटी 44 लाख 74 हजार 169 रुपयांची वसुली झाली.बारामती चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही सी बर्डे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी हे लोकन्यायालय पार पडले. जिल्हा न्यायाधीश 2 आर के देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती एस एस सस्ते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस टी चिकने, श्रीमती व्ही व्ही पाटील, दिवाणी न्यायाधीश क स्तर, व्ही व्ही देशमुख व न्या. पी पी काळे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड प्रभाकर बर्डे व सहकारी वकील यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोक अदालत पार पडली. समन्वयक म्हणून
मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले.
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित मोटर अपघात नुकसान भरपाई, दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे प्रकरणे, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टीची दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली होती.दाखल पूर्व प्रकरणांमध्ये 2 कोटी 25 लाख
82 हजार 474 रुपयांची वसुली झाली तर
दाखल प्रकरणांमध्ये 3 कोटी 18 लाख 91 हजार 695 रुपये वसूल झाले.मोटार अपघात खटल्यात एका प्रकरणात 50 लाख रुपये नुकसान भरपाई बजाज अलायन्स कंपनीतर्फे देण्यात आली.अर्जदारातफे ऍड बी ए देशमुख व ॲड
अभिजीत देशमुख तर बजाज अलायन्स
विमा कंपनी तर्फे हर्षल पिंगळे व ऍड लकडे
यांनी काम पाहिले.लोक अदालतीमध्ये पैसा वेळ व न्यायालयीन चकरा मुळे होणारा मानसिक
त्रास वाचतो तसेच येथे होणाऱ्या निकालांवर
अपील होत नाही त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लोक अदालतीमध्ये सहभागी
व्हावे असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश
व्ही सी बर्डे व न्यायाधीश 2 आर के देशपांडे
यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment