बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस ७ वर्षे सश्रम कारावासाची व १८,००० /- रुपये दंडाची शिक्षा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 1, 2025

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस ७ वर्षे सश्रम कारावासाची व १८,००० /- रुपये दंडाची शिक्षा..

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस ७ वर्षे सश्रम कारावासाची व १८,००० /- रुपये दंडाची शिक्षा..
बारामती:- बारामती येथील जिल्हा न्यायाधीश.
श्रीमती सुरेखा आर. पाटील सो. यांनी  बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस ७ वर्षे सश्रम कारावासाची व
१८,००० /- रुपये दंडाची शिक्षा सुनावली,याबाबत मिळालेली माहिती अशी की,
सोमनाथ किसन पवार रा. लोणी भापकर, ता. बारामती जि. पुणे यांस बारामती
येथील मे. तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ मा. श्रीमती सुरेखा आर पाटील यांनी अ. जा. ज.अ.प्र.का. क.दिनांक
२८/०२/२०२५ रोजी भा.द.वि. कलम ३७६ व ५०६ अंतर्गत व तसेच बाल लैगिक
अत्याचार कलम ४,८,१२ अंतर्गत आणि
३(१)(डब्ल्यू)(आय),३ (२) (व्ही.ए.) प्रमाणे आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व
एकूण अठरा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साध्या कारावासाची शिक्षा
सुनावली आहे.
या प्रकरणाची हकीकत
तेंव्हा मध्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी
सदरचा गुन्हा हा ता. १९ /१०/२०१८ रोजी संध्याकाळी सुमारे ५.००
वाजणेच्या दरम्यान अल्पवयीन फिर्यादीच्या वडीलांचा मित्र असणारा आरोपी सोमनाथ
किसन पवार याने फिर्यादी अल्पवयीन मुलगी अ.ब.क. वय १४ वर्षे हिस तिच्या
अल्पवयाचा गैरफायदा घेवुन ती अनुसुचित जातीची आहे हे माहीत असतानाही तिला
त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता फिर्यादी ही घरी आली तेंव्हा तिच्या
वडीलांसोबत घराबाहेर बसलेला होता.
अल्पवयीन फिर्यादीकडे बघून तिला बाहेर येण्यास सारखे इशारे करत होता, परंतू ती
त्यास नकार देत होती. त्यावर त्याने तिच्या जवळ जावून तिस धमकावले की, तु
आली नाहीस तर तुझ्या भावाला चाकूने खूपसून मारुन टाकीन, तुझी सायकल घे
आणि दत्त मंदिराजवळ लगेच ये. असे धमकावून पिडीतास जबरदस्तीने त्याच्या
मोटार सायकलवर बसवून शंभू मळा येथील शेतात नेवून तु मला आवडतेस व
तुझ्यासाठी मी तुझ्या घरी येतो असे बोलून तिच्यावर निर्घुणपणे जबरी लैंगिक
अत्याचार केला. सदरची घटना पिडीताने आईस सांगितली व त्या नंतर त्यांनी  वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे जावून पिडीताने स्वतः आरोपीविरुध्द फिर्याद
दिली व अशा प्रकारे आरोपीविरुध्द गून्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास हा डी. वाय. एस.पी. नारायण शिरगांवकर बारामती यांनी
केला व आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३७६, ५०६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक
कायदा कलम ४,८,१२ तसेच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा सुधारीत
२०१५ चे कलम ३ (१) (डब्लु) (एक), ३(२) (व्हीए) प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव
शिंगाडे व फिर्यादीचे वकील अॅड. परीश बाबूराव रुपनवर यांनी सरकार पक्षातर्फे ८
साक्षीदार तपासले. सदर पिडीता ही १४ वर्षाची असूनही तिने झालेली घटना
न्यायालयात सविस्तर सांगितली. तसेच वैद्यकीय पुरावा व परिस्थितीजन्य पुराव्या वरून
आरोपी यांना मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ सुरेखा आर पाटील सो यांनी आरोपी
नामे सोमनाथ किसन पवार यांना दोषी धरून शिक्षा सुनावली आहे.
विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण
कामकाज पाहिले. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व लेखी युक्तीवाद ग्राहय
धरुन न्यायालयाने आरोपी सोमनाथ किसन पवार यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली
आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे व फिर्यादी वकील अॅड परीश बाबुराव रुपनवर यांना पोलीस शिपाई भागवत पाटील यांनी तसेच कोर्ट पैरवी
श्रे.पो.स. ई. नामदेव नलवडे यांनी सहकार्य केले. तसेच सदर गुन्हयाचा तपास
तत्कालीन डी. वाय. एस.पी. नारायण शिरगांवकर यांनी केला व प्रभारी अधिकारी ओ.पी.
आय. सचिन काळे यांनी त्यांना सहकार्य केले.

No comments:

Post a Comment