वडगाव निंबाळकर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न . - vadgrasta

Post Top Ad

Thursday, April 24, 2025

वडगाव निंबाळकर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न .

वडगाव निंबाळकर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न . 
वडगाव निंबाळकर(प्रतिनिधी) - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते , बहुजन हक्क परिषद संस्थापक सुनील ( तात्या ) धीवार, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.  यावेळी आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते यांनी प्रबोधनात्मक भाषण केले . यावेळी सुनील धीवार यांनी जयंतीनिमित्त आयोजकांनी देखील चांगल्या रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले व हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . डिजे चा वापर न करता सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवत व त्यांच्या चळवळी कशाप्रकारे होते हे कसे समजेल याची काळजी घेत आंबेडकर जयंती साजरी करावी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी आपले मनोगत करताना व्यक्त केले.

 यावेळी मा. राजेश्वरराजे राजेनिंबाळकर युवा नेते , पै.नानासाहेब मदने , 
 केशव भोसले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष माळेगाव,
 सुनील ढोले सरपंच वडगाव निंबाळकर , शैलेंद्र (आप्पा) जाधव सामाजिक कार्यकर्ते , सचिन साठे चेअरमन श्रीनाथ पतसंस्था , अमोल सोनवणे साहेब विशेष सरकारी वकील ,  
हेमंत गडकरी उपाध्यक्ष राष्ट्रवादी कोग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा,   मुन्ना बागवान अल्पसंख्याक अध्यक्ष बारामती तालुका,  मयूर (आप्पा) भोसले बारामती तालुका युवक अध्यक्ष (शरद पवार गट), भाऊसो हुंबरे सरपंच करंजे , , संजय साळवे माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर,सचिन साळवे तंटामुक्ती छोटू जाधव  शाखाउपाध्यक्ष  वंचित बहुजन आघाडी वडगाव निंबाळकर अध्यक्ष तन्मय जाधव, अमित राजे , पांडा गेळगे जादूगार शिवम  भूषण सौरभ दरेकर, सुरज दरेकर वडगाव निंबाळकर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन आर्यन साळवे ,  आसिफ शेख  , विक्रम साळवे , आविष्कार साळवे , यांनी चांगले केले याबदल उपस्थित पाहुण्यांकडून त्यांचे सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले व आभार वडगाव निंबाळकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी केले.

No comments:

Post a Comment