आता पुण्यामध्ये 24 तास स्पीड ,रजिस्टर पोस्ट ,आंतरराष्ट्रीय स्पीड व पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध* - vadgrasta

Post Top Ad

Thursday, April 24, 2025

आता पुण्यामध्ये 24 तास स्पीड ,रजिस्टर पोस्ट ,आंतरराष्ट्रीय स्पीड व पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध*

*आता पुण्यामध्ये 24 तास स्पीड ,रजिस्टर पोस्ट ,आंतरराष्ट्रीय स्पीड व  पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध*
पुणे:- भारतीय डाक विभागातर्फे आता पुण्यामध्ये 24 तास स्पीड, पार्सल बुकिंग सर्विस उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळ प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या शेजारी पोस्टातर्फे स्पीड पोस्ट आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट आंतरराष्ट्रीय रजिस्टर पोस्ट ,आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग सेवा  देण्यात येणार आहे,  तरी सर्व नागरिकांना अपील करण्यात येत आहे. ह्या सर्विस चा सर्वांनी फायदा घ्यावा असे आव्हान श्री बाळकृष्ण पोपट  एरंडे,  अधीक्षक, रेल्वे मेल सर्विस पुणे यांनी केले आहे .यामध्ये रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी त्या दिवशी पण हे काउंटर चालू असणार आहे.  काही कारणास्तव पोस्ट ऑफिस च्या वेळेमध्ये पब्लिक ला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन वरील सेवा घेता येत नाही त्यामुळे ही सेवा पुणे रेल्वे मेल सर्विस यांनी ह्या साठी 24 तास हे काउंटर चालू केले आहे. तरीपण सर्व नागरिकांना विनंती आहे की ह्या सर्विस चा सर्वांनी फायदा घ्यावा .त्याचबरोबर ह्याच ऑफिस मध्ये आधार चे काम करण्यासाठी एक काउंटर लावण्यात आलेले आहे. वेळ सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत, ह्यामध्ये आधार कार्ड अपडेटेशन करणे ,पत्ता बदलणे, मोबाईल लिंक करणे .नवीन आधार कार्ड काढणे,  फोटो अपडेट करणे अशा सर्व सोयी देण्यात येतील. तरीपण सर्व नागरिकांनी या टपाल सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment