बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक...

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक...
बारामती:- ता. ०३/०६/२०२५ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना बारामती भिगवण रोड  येथे सव्हिस रोड वरती रोडच्या कडेला दोन इसम त्यांचे जवळ असलेल्या क्रेटा गाडी क एम एच १४ जे ए ०९०१ मध्ये बसलेले दिसुन आल्याने आम्ही त्यांचे जवळ जावुन त्यांना
त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याची नावे १) तन्मय कल्याण बनकर वय २६ वर्ष रा सहयोग सोसायटी समोर बारामती जि.पुणे व दुसऱ्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता तो गाडीतुन उतरून कोठे तरी पळुन गेला. तन्मय
यास त्यांचे नाव विचारले असता त्यांचे नाव राहुल उघाडे (पुर्ण नाव माहित नाही ) असे सांगितले असे सांगितले त्यांचेकडे चौकशी करीत असताना त्यांने उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे आम्ही पोलीस स्टाफने त्यांची व त्याच्या ताब्यात असलेल्या चारचाकी क्रेटा गाडीची झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिकीत एका खाकी बॉक्स मध्ये मेफेनटर्माइन ( MEPHENTERMINE ) या इंजेक्शनाच्या ९० बॉटल मिळुन आल्या इसम नामे १) तन्मय कल्याण बनकर वय २६ वर्ष रा सहयोग सोसायटी समोर बारामती जि पुणे (२)
राहुल उघाडे (पुर्ण नाव माहित नाही ) याचेवर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो कॉ जितेंद्र महादेव शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन सदर आरोपी पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली असुन आरोपी
नामे राहुल उघाडे हा फरार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनी भिताडे हे करीत आहेत.
सदरबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन शिवदास बुगड यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भेट देवून सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो. परंतू सध्या सदर इंजेक्शनचा
उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याची सांगितले आहे. तसेच सदर इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे, किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणाऱ्या इंसमांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी आवाहन केले आहे.तसेच, अशा प्रकारच्या शरीरास घातक असणारे इंजेक्शन घेवून स्वतः चे आरोग्याची तसेच शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा
असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी केले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप सिंग गिल . पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक बारामती श्री. गणेश बिरादार , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती श्री. सुदर्शन
राठोड . पोलीस निरीक्षक श्री. विलास नाळे यांचे मार्गदर्शनखाली सदरची कारवाई बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सतिश राउत, पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, अमिर शेख,
अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, जितेंद्र शिंदे, अक्षय सिताप, सागर जामदार, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment