चोरीस गेलेला ट्रॅक्टर व नांगर सुपा पोलिसांनी २४ तासाचे आत केला हस्तगत..
सुपा:- शेतकरी राजेंद्र बबन खोमणे धंदा शेती रा. आंबी 'बु' ता.बारामती जि.पुणे यांचे मालकीचा
५,०००००/- रुपये किंचा जॉनडियर कंपनिचा ५०४५ मॉडेलचा हिरवे रंगाचा ट्रॅक्टर व ३०,००० /- रुपये कंपनिचा लाल रंगाचा नांगर हा दिनांक १ / ६ / २०२५ रोजी रात्री ८:३० ते दिनांक २/६/२०२५ रोजी सकाळी ५ / ३० वाचे दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरी केले
बाबत सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९९/२०२५ बी. एन. एस. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये
गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा उघडकीस करणे बाबत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी
मनोजकुमार नवसरे सो यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे,महादेव साळुंके,व भाऊसाहेब चौधरी यांना गुन्हयाचे तपासा बाबत योग्य त्या सुचना देवुन तपास पथक रवाना केले. सदर घडले गुन्हयाबाबत गुप्त बातमी दारामार्फत मिळालेली माहिती, तांत्रीक तपास तसेच सी.सी. टिव्ही फुटेज वरुन संशईत आरोपी नामे १) बाळा उर्फ अविष्कार संजय तावरे वय २३ वर्षे रा.मोरगाव ता. बारामती जि.पुणे २) धिरज संदिप चव्हाण वय १८ वर्षे रा. मुर्टी ता.बारामती जि. पुणे ३) रोहन ज्ञानेश्वर माने वय १९ वर्षे मोढवे ता. बारामती जि. पुणे ४) चेतन कानोबा दगडे वय २५ वर्षे रा. मोढवे ता. बारामती जि. पुणे ५) ओमकार रमेश पवार वय २७ रा.मोरगाव ता.बारामती जि. पुणे याना ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस चौकशी
करता त्यांनी सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९९ / २०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३(२) हा
गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांचे कडुन गुन्हयात चोरलेला
५,०००००/–रुपये किंचा जॉनडियर कंपनिचा ५०४५ मॉडेलचा हिरवे रंगाचा ट्रॅक्टर व
३०,०००/-रुपये कंपनिचा लाल रंगाचा नांगर असा एकुन ५,३०,००० रुपये किंचा मुद्देमाल
जप्त करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये
असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा फौजदार वसंत वाघोले हे करीत आहेत.
रा.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक
श्री. गणेश बिरादार, मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली,स.पो.नि.मनोजकुमार नवसरे, पो. स. ई. जिनेश कोळी, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे,विशाल गजरे,दत्तात्रय धुमाळ, पो. कॉ. किसन ताडगे, महादेव साळुंके, भाऊसाहेब चौधरी, ऋषीकेश विर, निहाल वणवे,सुरज साळुंके, सचिन दरेकर, सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे, आदेश मवाळ यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment