ओव्हरलोड वाहने दरमहा हप्ते वसुली कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी आर पीआय चा कडक इशारा..
(राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे)चे
मा. सचिन भाऊ खरात पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने मा.सुरेंद्र निकम प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती जिल्हा पुणे.यांना नुकताच निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले की,ओव्हरलोड वाहने दरमहा वसुली कायमस्वरूपी बंद करणे तसेच मागील 3 वर्षापासून आम्ही आरटीओ बारामती करत असलेले बेकायदेशीर पैसे हप्ते वसुली बंद करावी IMV साळोखे यांना 3 वर्षे झालेत त्यांनी पैसे भरून बदली 1 वर्ष स्थगित केली आहे कारण हे वसुली बारामती मध्ये घेतात एजंट यांच्यामार्फत दरमहा ट्रक 2500 रुपये प्रमाणे गोळा करतात व अधिकारी यांना देतात आरटीओ बारामती यांना कोटी ने पैसे देतात वाहतूक संघटनेने आंदोलन करूनही हे पैसे बेकायदेशीर गोळा करण्याचे थांबत नाही, चालक महादेव तनपुरे व इतर यांच्यामार्फत 3020 ओव्हरलोड वाहने यांचे प्रत्येकी 2500 रुपये प्रमाणे 3020 वाहने प्रमाणे 2500 असे एकूण 3020x2500 = 75.50000/- रू75 लाख 50 हजार रुपये दरमहा बेकायदेशीर पैसे गोळा करतात तसे गाडी नंबर आमच्याकडे आहेत, मगर एजंट सारखे असे नऊ एजंट आहेत जेणेकरून गरीब वंचित परिस्थिती खूपच हलाखीची असणारे चालकांना लुटत आहेत हे वसुली रॅकेट बंद होणे करिता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या कार्यकाळात करणार आहोत यास सर्वस्वी जबाबदार आरटीओ बारामती प्रशासन राहील याची नोंद घ्यावी,वेळीच
ओव्हरलोड वाहनांचे हफ्ते बंद न झाल्यास 11 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) च्या शेकडो कार्यकर्ते यांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन बारामती आरटीओ कार्यालयासमोर घेणार आहोत याची नोंद असावी असे निवेदन आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देऊन आरटीओ कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कडक इशारा दिला असून सणसणीत आरोप करण्यात आले.यावेळी आरटीओ अधिकारी निकम यांनी आम्ही कारवाई करू याआधी देखील कारवाई केली असून आपल्या निवेदनानुसार कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

No comments:
Post a Comment