काळया काचा व विना नंबरप्लेट धोकादायकरित्या वाहन चालविण्या-या चालकांस उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा दणका.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 3, 2025

काळया काचा व विना नंबरप्लेट धोकादायकरित्या वाहन चालविण्या-या चालकांस उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा दणका..

काळया काचा व विना नंबरप्लेट धोकादायकरित्या वाहन चालविण्या-या चालकांस उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा दणका..
बारामती:-डॉ. सुदर्शन राठोड  उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग हे बारामती तालुका पोलीस स्टेशन याठिकाणी भेट देण्याकरीता निघाले असताना पेन्सिल चौक येथे भिगवण बाजुकडुन एक विनानंबरप्लेटची काळया काचा असलेली एक स्विप्ट कार ही भरधाव वेगाने चालवित रहदारींच्या नियमांचे उल्लघंन करून चालवित घेवुन येत असताना दिसले असता मा. डॉ. सुदर्शन राठोड  उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांनी पेन्सिल चौक येथे वाहतुक नियमन करीत असलेले अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना सदर वाहनांस थांबविण्याच्या सुचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी सदर वाहनांस थांबवुन त्याचे चालकांकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव राहुल राजेंद्र मदने रा.प्रगतीनगर ता.बारामती जि.पुणे असे सांगुन सदर गाडीबाबत विचारपुस केली.
त्याने सदर गाडी ही त्याचा मित्र महेश बापुसाहेब चौधरी रा.शिरूर जि.पुणे याची असलेचे सांगुन गाडीमध्ये असलेले इतर इसमांची चौकशी केली असता त्यामध्ये अक्षय कांबळे रा.आमराई ता.बारामती जि.पुणे असे सांगुन सदर इसमांची चौकशी केली असता अक्षय कांबळे हा सराईत गुन्हेगार असलेचे निष्पन्न होवुन त्याचेवर बारामती शहर पोलीस स्टेशनकडे तडीपार प्रस्ताव तयार असलेने त्याचेवर पुढील कारवाई करण्याकरीता त्यांस बारामती शहर पोलीस स्टेशनकडे त्यांस ताब्यात दिले.
 वाहन चालक राहुल मदने याचेवर ही दोन गुन्हे दाखल असुन त्याने त्याचे ताब्यातील वाहन रहदारींचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालविल्याने त्याचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments:

Post a Comment