बापरे..कोरोना पेक्षा हॉस्पिटलचीच जास्त भीती..नको पुन्हा ते दिवस.!(भाग-१)
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या १० दिवसांत कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, गेल्या १० दिवसांत रुग्णसंख्या २५७ वरून थेट ३७०० पार गेली आहे.हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. जर हीच स्थिती राहिली,तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाउन
लागणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
१० दिवसांत रुग्णसंख्या २५७ वरून ३७०० पार
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार,सध्या देशात कोविडचे ३७५८ अॅक्टिव्ह प्रकरणं आहेत.मागील १० दिवसांत १२०० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. २२ मे २०२५ रोजी देशात फक्त २५७ सक्रिय प्रकरणं होती, जी २६ मेपर्यंत १०१० झाली. गेल्या २४ तासांत ३६३ नवीन प्रकरणं समोर आली असून, दोन रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे.यामुळे आत्ता जनतेत भीतीचे वातावरण झाले असले तरी सर्वात जास्त त्यांना हॉस्पिटलची वाटू लागलीय अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, कारण ही तसेच आहे.२०१९ ते २०२१ च्या दरम्यानचा कार्यकाळ आठविला की अंगावर आजही काटा येतो, कोरोना-१९ हा आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पसरला होता,यावर उपचार ही तसेच जोमाने सुरू होते याबाबत सरकार काळजी घेत होते, परंतु दुर्देवी परिस्थिती अशी झाली होती की यामध्ये अनेक कुटुंब कोरोनाने हिरावून नेले हजारो लोक यामध्ये बळी गेले, अनेकांचे कुटुंब व घर उदवस्थ झाले. जवळचे लोक लांब जाऊ लागले, कुणी कुणाची दया माया करीत नव्हते, अशातच अनेक कोरोनाच्या पेशंट ना खाजगी हॉस्पिटल उपचाराच्या नावाखाली लुटत होते, मेडिकल वाले वेगळेच,लस, रेमडिसिव्ह,प्लाझ्मा,मास्क, ऑक्सिजन या सारखे उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या औषधे यामध्ये भरमसाठ रक्कम स्वीकारली गेली, उपचारासाठी ऍडमिट असणाऱ्या पेशंट जगला काय आणि मेला काय याचे काही घेणे देणे नसणाऱ्या हॉस्पिटलवाल्यानी मात्र हॉस्पिटलची शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम वसूल केली एवढे करूनही मयत पेशंट नातेवाईकांना त्यावेळी मिळत नव्हेत ते बेवारस सारखे जाळले जात होते इतके भयानक वेळ आपल्या वर आली होती हे आजही लोक विसरले नाहीत, आणि आत्ता पुन्हा आपल्या देशात झपाट्याने कोरोनाचा वाढतोय हे ऐकून कोरोना पेक्षा जास्त लुटमार करणाऱ्या हॉस्पिटलचीच भीती वाटू लागलीय... (भाग-२ पुढील अंकी )
No comments:
Post a Comment