अंमली पदार्थ गांजा सह एकुण ९३,६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 19, 2025

अंमली पदार्थ गांजा सह एकुण ९३,६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

अंमली पदार्थ गांजा सह एकुण ९३,६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..
पुणे:- अंमली पदार्थ विरोधी पथक - १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईत
मेफेड्रोन(एम.डी), ओझी कुश (हायड्रोपोनिक ) गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणारे
गुन्हेगार जेरबंद करण्यात आले,दिनांक १८/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, कोंढवा पोलीस स्टेशन
पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स पुणे युनीट असे संयुक्त पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना धर्मावत नगर, गगन एव्हेन्यु बिल्डींग जवळ, येसाजी कामठे चौक, सार्वजनिक रोडवर कोंढवा पुणे येथे ग्रे रंगाच्या फोर व्हिलर कार मध्ये रेकॉर्ड
वरील आरोपी नामे अभिनव प्रदिप गुप्ता हा त्याच्या एका साथीदारासह संशयीतरित्या बसलेले मिळुन आल्याने त्यांच्याकडे विचारपुस करता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमांची झडती घेतली असता आरोपी नामे १) अभिनव प्रदिप गुप्ता वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ए ३०१, लक्ष्मण पार्वती सोसायटी,शिवणे पुणे याचे ताब्यात ८२,८००/- रु. किं.चा. ८ ग्रॅम २८ मिलीग्रॅम ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा हा
अंमली पदार्थ, ८२०/- रु. किं चा बिया - बोंडासह तपकरी - काळसर रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/-रु.किं.चा एक मोबाईल फोन, असा एकुण ९३,६२० /- रु. किं.चा ऐवज मिळुन आला. तसेच इसम नामे २)इरशाद इफतीकार शेख वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं ११०४, होममुड सोसायटी, पारगेनगर, कोंढवा पुणे याचे
ताब्यात २,०४,२००/-रु. कि. चे १० ग्रॅम २१ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ, ५,००,०००/- रु. किं.ग्रे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची बलेनो फोर व्हिलर कार नंबर एम एच १२ टि डी ५८२८, ६०,०००/-रु.किं चे दोन मोबाईल फोन, १,०००/- रु. किं चा एक इलेक्ट्रीक वजन काटा, ११ छोटा प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशव्या, एक सिगारेटचे मोकळे पाकीट, एक गुलाबी रंगाची प्लॅस्टीकची पिशवी त्यामध्ये पारदर्शक प्लॅस्टीकच्या पिशवीचा बंच असा एकुण ७,६५,२०० /- रु किं. चा ऐवज मिळुन आला. असा नमुद दोन्ही इसमांकडे मिळुन एकुण ८,५८,८२०/-रु. कि.चा ऐवज मिळुन आला. नमुद दोन्ही इसमांच्या ताब्यात
अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन एम.डी, ओझी कुश(हायड्रोपोनिक) गांजा, हा अंमली पदार्थ  विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५६७/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २० (ब) (ii) (अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त,गुन्हे शाखा श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे - २ श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक - १, गुन्हे शाखा पुणे
शहर श्री. प्रशांत अन्नछत्रे,सहा.पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, विनायक साळवे, मारुती पारधी,दयानंद तेलंगे, नागनाथ राख, नितिन जाधव, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, सुहास डोंगरे, संदेश काकडे,
दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment