बारामती:- दिनांक १९ जुलै २०२५
बारामतीचे सुपुत्र सन्माननीय श्री संजयजी लक्ष्मण जाधव सर (शिक्षण विस्तार अधिकारी तथा बारामती नगरपरिषद प्रशासनाधिकारी.)सन्माननीय श्री संजयजी जाधव सर यांची सेवानिवृत्ती दिनांक ३० जून २०२५ रोजी नियमानुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा बारामती टकारी समाज बांधव यांच्या वतीने मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, बाळासाहेब(अनिल)गायकवाड, विलास तात्या गायकवाड, संतोष जाधव(पत्रकार),संजय गायकवाड, बाळासाहेब(महाराज)जाधव,जाधव साहेब,अनिल जाधव,लव्हू जाधव.गुळवे सर यांनी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
उच्च पदावर कार्यरत राहणे यातच सर्व गुण संपन्न अशा लौकीकाला साजेशी प्रशासकीय सेवा, न्याय कर्तव्य भूमिकेतूनच पार पाडलात याचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो तसेच
शिक्षणाचा प्रसार, प्रचार व विस्तार तसेच काटेकोर अंमलबजावणी आणि शिस्तबद्ध कार्यप्रणाली अमलात आणून शैक्षणिक योजना विकसित करतांना, याच न्यायाने केलेली सेवा ही प्रशासकीय दृष्टीने वाखाणण्यासारखी व कौतुकास्पद बाब आहे.
सर आपले आरोग्य संपदा सुदृढ, निरोगी व तंदुरुस्त राहो, आपल्या दैनंदिन जीवनात आनंदाचे क्षण कायम राहो, तसेच आपल्या अंगी असलेल्या उत्तम कलेचे सादरीकरण म्हणून कविता, पोवाडा, सुत्रसंचलनाचे सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट वक्तृत्व अशी ओळख असलेली प्रतिमा ही कायम श्रोत्यांना मनमुरादपणे आनंद देणारी ठरो हीच प्रार्थना व सदिच्छा बारामती टकारी समाज बांधवांनी यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment