जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपार कष्टामुळे यशाची शिखर गाठू शकतो. - के. बी. कांबळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 1, 2025

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपार कष्टामुळे यशाची शिखर गाठू शकतो. - के. बी. कांबळे

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपार कष्टामुळे यशाची शिखर गाठू शकतो. - के. बी. कांबळे
सोलापूर(प्रतिनिधी):-- सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संकुलात " लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि स्थानिक निधी लेखा परीक्षक दिन" साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष - सुबोध सुतकर, (प्राचार्य- यशोधरा प्रशाला व ज्युनिअर कॉलेज), प्रमुख पाहूणे- मा. के. बी. कांबळे (लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन), प्रमुख उपस्थिती-प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवानंद डुणगे, सुधीर वाघ (सेवाजेष्ठ शिक्षक), सिद्धाराम शेगाव (उच्च माध्यमिक विभाग प्रमुख) सुवर्णा भांगे (सेवाज्येष्ठ शिक्षिका), या मान्यवरांच्या हस्ते 'लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
       कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. कांबळे (लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन) यांनी लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच स्थानिक निधी लेखा परीक्षक दिन याबाबतीत माहिती सांगितली. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपार कष्टामुळे यशाचे शिखर प्राप्त होते. इयत्ता 1 ली ते 12 वी मधील काही विद्यार्थ्यांनी भाषणे केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुबोध सुतकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना 'लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' जीवनाविषयी महत्त्व सांगितले शिक्षकांतून सुधीर वाघ, प्रियंका कांबळे, केशर कस्तुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम शेगाव, सुत्रसंचालन - मधूरा चोपडे, श्रीदेवी मदभावी तर आभार-नुरअहमद कारंजे, कविता पाटील यांनी केले.

        संस्थेचे अध्यक्ष- मा. रमेश सुतकर व संस्थेचे सचिवा- मा. विमल सुतकर यांनी 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती' निमित्त आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment