बारामती:- बारामतीमध्ये गुन्हेगारीच्या
घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत
आहे. भररस्त्यात हत्या, अपहरण करुन
आरोपी हातात शस्त्र घेऊन असल्याचे
व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतात.
खून, दरोडे, मारामारी अशा घटना सतत
वाढत या वाढत्या गुन्ह्यांवर पोलिसांचा धाक
काही उरला की नाही असाच प्रश्न उपस्थित
होत आहे याबाबत पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे,हायवा डंपरने तीन जणांचा बळी घेतल्याने बारामतीत भयमुक्त वातावरण झाले असताना बारामतीत चालू एसटीत प्रवाशावर भयंकर हल्ला करून प्रवासी
गंभीर जखमी करून हल्लेखोराचे
एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला
झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती-इंदापूर
मार्गावर काटेवाडी येथे घडलेल्या या घटनेत
हल्लेखोराने स्वत:वरही हल्ला केला. या हल्ल्यामध्ये
दोघेही जखमी झाले असून पोलिसांनी
हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. घटनेनंतर
परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. बारामतीमध्ये ही
भयंकर घटना समोर आली
घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा
वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने वार
प्रवाशांच्या माहितीनुसार, बस काटेवाडी येथे
थांबली असताना हा भयंकर प्रकार घडला.या
घटनेने बसमधील प्रवासी घाबरले आणि
एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशाला
तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल
करण्यात आलं असून, त्याची प्रकृती गंभीर
आहे. हल्लेखोरालाही तात्काळ ताब्यात घेतलं
असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी
रुग्णालयात नेण्यात आलं आहे.हा हल्ला वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याची
शक्यता
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला
आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यामागील
कारण वैयक्तिक वाद असण्याची शक्यता
वर्तवली जात आहे. या प्रकरणानंतर बारामती
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची
प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात
भीतीचं वातावरण पसरलं असून, प्रवाशांच्या
सुरक्षिततेबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांनी हल्लेखोराची चौकशी सुरू केली
असून, लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण
होईल, असं सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment