बारामती:- आज वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या जाण्याने एकदाच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होत असते. त्यांनी जे प्रेम आणि संस्कार दिले, ते कधीही विसरू शकत नाही. त्यांचे आशीर्वाद नेहमी मुलांच्या पाठीशी आहेत, आणि त्यांच्या स्मृतींना नेहमीच आदर राहील.याचं उदाहरण म्हणजे आजच्या काळात पाहायला मिळाले आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आदरणीय मुख्याध्यापक मा.श्री.मच्छिंद्रनाथ रघुनाथ कोळेकर सर व सौ.कोळेकर मॅडम यांचेकडून सरांच्या वडिलांच्या स्मरणार्थ तांदुळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी ,चित्रकलेची वही ,व रंगपेटी वाटप
सोबत लापशी, सांबर- भाताचे गोड जेवण देण्यात आले तसेच स्वतःच्या गावात जळकेवाडी याठिकाणी देखील सर्व विद्यार्थ्यांना चित्र चित्रकला वह्या,व कंपास पेटी व जिलेबी गोड जेवण देण्यात आले.दुःखाच्या छायेत आठवणीत न राहता त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जे आपुलकीने वागविले ते कौतुकास्पद आहे, आपल्या वडिलांना त्यांनी कायम आपल्या कार्यातून जिवंत ठेवले यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीनी व कुटुंबातील लोकांनी व आपल्या शाळेतील शिक्षक वर्ग यांनी देखील साथ दिली.
No comments:
Post a Comment