बारामती :- नुकताच इंदापूर बारामती रस्त्यावर काटेवाडी याठिकाणी चालू एसटी बसमध्ये दहा
दिवसांपूर्वी एका माथेफिरू तरुणाने
कोयत्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत
गंभीर जखमी झालेल्या वर्षा रामचंद्र
भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी,
बारामती) यांचा पुण्यातील खाजगी
रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी
(दि. ६) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.
३१ ऑगस्ट रोजी काटेवाडी (ता.
बारामती) येथे बारामती-इंदापूर रोडवर
एसटी बसमधून वर्षा भोसले या त्यांच्या
माहेरी निघाल्या होत्या. बस मधील
मागील सीटवर बसलेल्या अविनाश
शिवाजी सगर (वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारील सीटवरील पवन अनिल गायकवाड या तरुणावर
कोयत्याने हल्ला केला. या अचानक
घडलेल्या घटनेमुळे बसमधील प्रवासी,
विशेषतः महिला आणि विद्यार्थिनी,
भयभीत झाल्या. काही प्रवाशांनी चालू
बसमधून उड्या मारल्या, तर चालकाने
प्रसंगावधान राखून बस काटेवाडी
उड्डाणपुलावर थांबवली.या गोंधळात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळताना भयभयीत झालेल्या वर्षा भोसले जोरात पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. वालचंदनगर व बारामती ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अविनाश
सगर याला ताब्यात घेतले. पवन गायकवाड याच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी वर्षा भोसले यांना प्रथम बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी
रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र,पाच
दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची
प्राणज्योत मालवली.वर्षा भोसले या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक
रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मूळ इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीतील यादगार सिटी येथे वास्तव्यास आहे.या माथेफिरू(कोयता धारी)
तरुणाच्या हल्ल्यामुळे एका निरपराध
महिलेचा हकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अश्या घटनांमुळे महिला व विद्यार्थ्यांच्यात भीतीचे वातावरण झाले असल्याचे अनेक व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडत चालली असून वाढते अवैध धंदे यातून वाढती गुन्हेगारी व व्यसनाला बळी पडलेले अल्पवयीन,तरुण वर्ग तर काहींची मानसिकता ढासळत जाताना दिसत असून मग गंभीर गुन्हे करून नंतर मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत असल्याचे दिसते अशी कितीतरी घटना घडल्या की त्यामध्ये माथेफिरू असल्याचा दावा तपासात केला असल्याचे उदाहरणे आहेत. मुळातच अवैध धंदे बंद न झाल्याने वाढलेली गुन्हेगारी याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण मात्र भय भयीत झालेल्या वातावरणात सुरक्षा महत्वाची असल्याचे महिलांनी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment